सर्वात शक्तिशाली ‘अपाचे’ हेलिकॉप्टर हवाई दलाच्या ताफ्यात, पाकिस्तानच्या सीमेवर करणार तैनात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत पाकिस्तानमधील वाढता तणाव लक्षात घेता देश सर्व ठिकाणी मजबूत हवा यासाठी भारताने सुरक्षेसाठी काही नवीन हेलिकॉप्टरची खरेदी केली आहे. अपाचे नावाचे हे हेलिकॉप्टर जगात सगळ्यात धोकादायक हल्ल्यासाठी वापरले जाते. मंगळवारी पठाणकोट मध्ये हे हेलिकॉप्टर दाखल झाले. असे एकूण २२ चॉपर्स भारतात येणार आहेत.

या हेलिकॉप्टर्सला ‘मल्टी रोल कोंबट हेलिकॉप्टर’ असंही म्हणतात. भारतीय हवाई दलाचे प्रमुख बीएस धनोआ हे भारतीय हवाई दलात जगातील सर्वात शक्तीशाली हेलिकॉप्टर सामील करणार आहेत.

काय आहेत नेमकी या हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये –

दिवसाप्रमाणे रात्रीही तितक्याच ताकदीने काम करू शकते. कारण याच्यापुढे जो सेन्सर बसवण्यात आले आहे ते रात्रींचाही काम करते. यामुळे आता रात्रीच्या वेळीही कोणत्या ठिकाणी हे चॉपर घुसू शकते. टू सीटर अपाचे अ‍ॅटॅक हेलिकॉप्टरमध्ये हेलिफायर आणि स्ट्रिंगर क्षेपणास्त्र आणि प्रत्येक बाजूला दोन 30 मिमी बंदुका आहेत.

बाकी हेलिकॉप्टरच्या मानाने यात खूप काही विशेष आहे. यात त्याचे हेल्मेट माउंटेड डिस्प्ले सर्वात महत्वाचा आहे. ज्याच्या मदतीने हेलिकॉप्टरमधील पायलट सहजपणे शत्रूला लक्ष्य बनवू शकतो. प्रति तास 365 किमी वेगाने उड्डाण करू शकतं, ताकदीने अचाट असूनही हे हेलिकॉप्टर खूप गतिशील आहे.

हे हेलिकॉप्टर MI 35 या हेलिकॉप्टरची जागा घेणार आहे. पहिला अपाचे स्क्वॉडर्न ग्रुप कॅप्टन एम शयलूच्या यांच्याकडे असणार आहे. त्यांनी अपाचे हेलिकॉप्टरवर सखोल प्रशिक्षण घेतलं आहे. यामुळे भारताची शत्रूवर हल्ला करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –