पिंपरी चिंचवड शहरात २४ तासात आठ ‘पॉझिटिव्ह’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी रात्री नऊ ते मंगळवारी रात्री नऊ या २४ तासात आठ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये महिला आणि पुरुष आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरोना बाधित रुग्णांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील सहा रुग्ण मंगळवारी आढळून आले आहेत. त्यामध्ये 29, 32, 63 वर्षाचे तीन पुरुष रुग्ण आहेत. तर, 53, 54 आणि 55 वय वर्ष असलेल्या या तीन महिला रुग्ण आहेत. हे रुग्ण भोसरी, खराळवाडी, गांधीनगर भागातील आहेत. दरम्यान मागील सात दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. आज एकाच दिवशी सहा जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

8 एप्रिल पासून शहरात दररोज कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण येत आहेत. मागील सहा दिवसांत तब्बल 23 नवीन रुग्णांची भर पडली आहे. 8 एप्रिलला एक, 9 ला तीन, 10 एप्रिल रोजी चार, 11 एप्रिलला दोन , 12 एप्रिलला पाच आणि 13 एप्रिल रोजी दोन आणि आज 14 एप्रिल एकाच दिवशी सहा जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.