चाकणमधून सव्वा आठ लाखाच्या दूध पावडर बॅग चोरीला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – गोडाऊनचे शटर कापून अज्ञात चोरट्यांनी गोडावूनमधून वारणा दूध कंपनीच्या 8 लाख 12 हजार 500 रुपये किमतीच्या दूध पावडरच्या बॅगा चोरून नेल्या. ही घटना मंगळवारी (दि. 19) सकाळी आठच्या सुमारास कुरुळी येथे उघडकीस आली.

बिरेंद्रसिंग गुसावीसिंग भंडारी (49, रा. मोशी प्राधिकरण) यांनी फिर्याद दिली आहे. तर अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण जवळ कुरुळी येथे ग्रेव्हिस फूड्स प्रा. लि. या कंपनीचे गोडावून मध्ये बिरेंद्रसिंग नोकरी करतात. त्यांनी सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गोडाऊन कुलूप लावून बंद केले.

रात्री अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनच्या लोखंडी शटरचे कडी आणि कोयंडे गॅस कातरने कापून आत प्रवेश केला. गोडाऊनमधून वारणा डेअरी कंपनीच्या दूध पावडरच्या 8 लाख 12 हजार 500 रुपये किमतीच्या 130 बॅगा चोरून नेल्या. तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Visit : Policenama.com