दुर्दैवी ! मेंढ्यांच्या कळपावर वीज पडून 8 गाभण मेंढ्या ठार तर 16 जखमी

पिंपरी- चिंचवड/ देहूगाव : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड जवळच्या देहूगावामधील सांगुर्डी Sangurdi येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. काल झालेल्या विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसामध्ये तेथील एका मेंढ्यांच्या कळपावर वीज पडून ८ गाभण मेंढ्यां मृत्युमुखी पडल्या आहेत. तर १५ ते १६ मेंढ्या जखमी झाल्या आहेत. ही घटना सायंकाळी ७ च्या दरम्यान घडली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवार यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण

सांगुर्डी Sangurdi येथील अमृता कर्हे यांच्या त्या मेंढ्या आहेत. या दुर्दैवी घटनेमध्ये जवळपास दोन लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेबाबत माहिती समजताच सांगुर्डी गावचे पोलीस पाटील सोनम काळे, गावचे सरपंच वसंत भसे, कृष्णा भसे, नारायण मराठे, संतोष भोसले, सुदाम भसे, गोविंद भसे,गणेश भसे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच सर्वानी अमृता कर्हे यांना धीर दिला आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांना नेटकऱ्यांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘ताई, तेथील आमदार तुमच्या भाजपचेच’

या दरम्यान, सांगुर्डे गावचे सरपंच वसंत भसे यांनी संबंधित अमृता कर्हे यांच्या मृत मेंढ्यांचा पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील केली आहे.

 

Also Read This : 

दिलासादायक बातमी ! कोरोनाच्या केस होताहेत कमी, 12 आठवड्यानंतर मृत्यूंचे आकडेसुद्धा घसरले

‘या’ वयात सर्वात जास्त मिळतो शरीरसुखाचा आनंद, जाणून घ्या कालावधी

‘प्रेमा’ला विरोध झाल्याने चुलत बहिण-भावाने केली ‘आत्महत्या’

Pune : भरधाव दुचाकीनं रस्ता क्रॉस करणार्‍या 7 वर्षाच्या सियाला उडवलं; चिमुरडी गंभीर जखमी