गॅलरीतून डोकावताना तोल जाऊन आठ वर्षाच्या मुलीचा मृत्यू

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाईन 

गॅलरीतून डोकावताना तोल जाऊन तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडून ८ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना भिवंडी शहरातील इस्लामपुरा परिसरात शनिवारी दुपारी घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत सुद्धा कैद झाली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4d6afb7e-bfb6-11e8-9e5f-59ef0b4e1285′]

याबाबत पोलिसांनी सांगितले की, भिवंडी शहरातील इस्लामपुरा परिसरातील अब्दुल रफिक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सईद अहमद मोमीन आपल्या परिवारासह राहत असून इमारतीच्या गॅलरीत लोखंडी जाळी बसवण्यात आली होती. बाहेरुन किराणा घेण्यासाठी या लोखंडी जाळीला थोडा गॅप ठेवण्यात आला होता.

गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये चकमक, पोलिस अधिकाऱ्याने गोळी झाडली

सईद अहमद मोमीन यांची मुलगी तकदीस सईद अहमद मोमिन (वय ८) ही शनिवारी दुपारच्या सुमारास गॅलरीमध्ये स्टूल लावून लोखंडी जाळीतून बाहेर डोकावत होती. तेवढ्यात तिचा तोल जाऊन एकदम इमारतीच्या तिसºया मजल्यावरून खाली पडली. त्यानंतर स्थानिकांनी तिला प्राथमिक उपचाराकरता भिवंडीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तकदीसची परिस्थिती गंभीर असल्याने तिला ठाण्यातील टायटन हॉस्पिटलमध्ये पुढील उपचाराकरता हलवण्यात आले होते. उपचार सुरु असताना तिचा मृत्यु झाला.

रेल्वेमध्ये सराफा व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याकडील २ कोटी रूपये  लुटले

दरम्यान, या घटनेची अकस्मात मृत्यु अशी नोंद निजामपुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून निजामपुरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.