संतापजनक ! नातेवाईकांसह 16 जणांनी केला चिमुकलीवर बलात्कार, 8 वर्षीय मुलीचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका 8 वर्षीय मुलीचा 16 जणांनी बलात्कार केल्याने गुरुवारी मुलीचा मृत्यू झाला. हे प्रकरण चेन्नईच्या विलुपुरमचे आहे. पोलिसांनी सांगितले की मुलीला अनेक दिवसांपासून पोट दुखीचा त्रास होत होता, तसेच तिला ताप देखील येत होता. पोलिसांनी हे प्रकरण सीआरपीसीच्या कलम 174 अंतर्गत दाखल केले आहे.

तिसरीमध्ये शिकणारी मुलगी आपली आई, मोठी बहिण, सावत्र वडील आणि सावत्र भावासोबत राहत होती. गुरुवारी रात्री जेव्हा ती बाथरुममध्ये गेली तेव्हा परत बाहेर आली नाही, त्यानंतर आईने शेजारच्या मदतीने दरवाजा तोडला तेव्हा मुलगी कोपऱ्यात निपचिप पडलेली दिसली. तिला रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 2017 मध्ये मुलीची आई तिच्या पतीपासून वेगळी झाली होती आणि चेन्नईला निघून आली होती. या दरम्यान तिने आपल्या दोन मुलींना नातेवाईकांकडे सोडले होते.

चेन्नईला गेल्यानंतर जेव्हा 1 वर्षांनी मुलीची आई परत आली तेव्हा तिला माहित झाले की आपल्या मुलींसह लैंगिक शोषण आणि बलात्कार झाला आहे. यानंतर महिला मुलींना घेऊन पॉंडेचेरीला गेली आणि एका शाळेत मुलींना प्रवेश मिळवून दिला.

शाळेत मुलगी अचानक बेशुद्ध पडली त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर मुलीबरोबर बलात्कार झाल्याचा खुलासा झाला. तेव्हा लक्षात आले की मुलीवर नातेवाईक आणि अन्य दोघांनी 2 वर्षांपर्यंत बलात्कार केला.

चाइल्ड हेल्पलाइनच्या निर्देशानंतर मुलीच्या आईने तिंडिवनममध्ये 16 लोकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाई केली होती आणि 16 लोकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर नोकरी मिळाल्यानंतर आई मुलीला घेऊन चेन्नईला आली होती.

You might also like