खळबळजनक ! सख्ख्या भावानेच मित्रांसह केला 8 वर्षाच्या बहिणीवर ‘बलात्कार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशात विकलांग बहिणीवर भावानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मेरठमधील कंकरखेडा या गावात हि घटना घडली असून पीडित मुलगी हि विकलांग असून तिला बोलता देखील येत नाही. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली असून तिचा भाऊ आणि अन्य तीन मुलांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून भाऊ आणि त्याच्या तीन मित्रांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला आहे.

या घटनेविषयी माहिती देताना पोलीस निरीक्षक एपी मिश्रा यांनी सांगितले कि, मुलीला एका खोलीत घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. पीडित मुलगी घराच्या बाहेर एकटी खेळात असताना या मुलीला फसवून या घरात घेऊन येऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला. घटनेवेळी मुलीने विरोध केला असता तिचा गळा दाबून हत्येचा देखील प्रयत्न करण्यात आला. या मुलीची तब्येत खालावल्यानंतर या मुलांनी तिला सोडून दिले. या घटनेत सहभागी असलेल्या मुलीच्या भावाचे वय १२ वर्ष असून त्याचे तीन मित्र देखील अल्पवयीन आहेत.

दरम्यान, पोलिसांनी चारही जणांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असून न्यायालयाने त्यांची रवानगी सुधारगृहात केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like