पत्नीचा सेक्स टेप पाहून भडकला पती, मुलांसमोरच घातल्या गोळ्या

वॉशिंग्टन :  वृत्तसंस्था – आपल्या मित्रासोबत पत्नीला सेक्स करतानाचा व्हिडीओ पाहून संतापलेल्या पतीने मुलांसमोरच तिचा गोळी झाडून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार अमेरिकेतील फ्लोरिडा येथे घडला असून पत्नीवर गोळीबार केल्यानंतर सासू आणि सासऱ्यावरदेखील गोळीबार केला. यप्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

आरोपी पती विल्यम स्टिलवेल याने त्याची पत्नी आपल्या मित्रासोबत सेक्स करत असल्याचा व्हिडीओ पाहिला. त्यामुळे त्याचा राग अनावर झाला होता. दरम्यान, संतापलेल्या विल्यमने  9एमएम पिस्तुलातून पत्नीवर गोळ्या झाडल्या. यावेळी त्याची जुळी मुले त्याला हत्या करू नको म्हणून विनवत होती. मात्र संतापलेल्या विल्यमने पत्नी मोना हिच्यावर धडाधड गोळ्या झाडल्या. त्याच मोना हिचा मृत्यू झाला.

दरम्यान, गोळीबाराचा आवाज ऐकलेल्या व्यक्तीने पोलिसांना फोन केला. या गडबडीत या दाम्पत्याची दोन मुले आणि तीन पाळीव कुत्री घराबाहेर पडण्यात यशस्वी झाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत विल्यमला अटक केली आहे.