‘डायबेटीस’च्या रुग्णांसाठी वरदान ठरते मेथी ! जाणून घ्या ‘हे’ 10 मोठे फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मेथी एक पथ्यकर भाजी आहे. मेथीची पानं प्रचंड गुणाची, सारक, पाचक, वातानुमोलक, पित्तनाशक आणि सूज कमी करणारी आहेत. मेथीच्या बिया वातहारक, पौष्टीक, रक्तसंग्राहक आणि गर्भाशय संकोचक आहेत. बिया रक्त आणि पित्तवर्धक आहेत. आज आपण मेथीच्या फाद्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

1) पित्तप्रधान मलावरोधात पालेभाजीचा उपयोग पोट साफ करण्यासाठी होतो.

2) पित्तप्रधान ज्वरात मेथीच्या पानांचा रस घ्यावा. जखम आणि सूज या दोन्ही लक्षणात मेथीची पानं वाटून लेप लावावा.

3) रक्त पडणाऱ्या आवेत कोवळ्या पानांची भाजी उपयुक्त आहे.

4) मेथीची पालेभाजी, हृद्रोग, भगंदर, कृमी, खोकला कफ, वातरक्त, महारोग, उलटी, अरुची, ताप या विकारात पथ्यकर म्हणून नक्की वापरावी.

5) बाळंतपणात मेथीच्या बियांचे सुगंधी पदार्थांसोबत लाडू करून देतात. त्यामुळं बाळंतीणीस चांगली भूक लागते. खाल्लेलं अन्न पचतं. अजीर्ण होत नाही. शौचास साफ होते. रक्तस्राव कमी होतो. गर्भाशय लवकर पूर्ववत होतं. स्थूलपणा वाढत नाही. कमरेचा घेर कमी होतो.

6) मेथी ही वात आणि पित्तप्रकृती रुग्णांसाठी उत्तम आहे. मेथी बियांचं विशेष कार्य पचनसंस्थांवर आहे. मेथी चावून खायला लागल्यापासून लाळास्राव उत्तम सुरू होतो.
7) आधुनिक विज्ञानाचे अभ्यासक मधुमेह या मधुमेह या व्याधीसाठी जी एकमेव वनस्पती मानतात ती म्हणजे मेथी आहे. मेथी बियांचा प्रत्येक कण तोंडातील, आमाशय, पच्यमानाशय, स्वादुपिंड या आतड्यातील गोडपणावर, कफावर कार्य दरक्षणी करीत असतो. त्यामुळं नुसत्या मेथ्या चावून खाणं, मेथी पालेभाजी खाणं, मेथी पालेभाजीचा रस पिणं असे अनेक उपाय जगभर मधुमेही माणसं यशस्वीपणे करत आहेत. सर्वात सोपा उपाय म्हणजे एक चमचा मेथी पूड एक पोळीला लागणाऱ्या कणकेत मिसळून अशा हिशोबात पोळ्या खाणं. यामुळं रक्तातील साखर कमी होते, नियंत्रित राहते. शरीराचा बोजडपणा कमी होतो.

8) मेथीच्या बियांमुळं आमाशयातील कफाचं विलयन आणि यकृताचे स्राव निर्माण करणं, वाढवणं, आहार रसांचं शोषण ही कार्ये होतात.

9) आमवातात रसादी धातू क्षीण आणि दुर्बल होतात. हृदय दुर्बल होतं. त्यासाठी मेथी आणि सुंठ चूर्ण मिसळून भोजनोत्तर घ्यावं. शरीर निरोगी आणि सबल होतं.

10) मेथीच्या फाजिल वापरामुळं शुक्रनाश होण्याची शक्यता असते. गरगरणं, चक्कर, अंधेरी ही लक्षणं दिसल्यास मेथीच वापर करू नये.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे किंवा तुम्हाला सूट न होणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.