‘अजितदादा नाराज आहेत, अरे कशाला !’ एकनाथ खडसेंच्या प्रवेशावेळी शरद पवारांनी केलं स्पष्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या 40 वर्षांपासून भाजप सोबत असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मुलगी रोहणी यांच्यासह अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Nationalist Congress Party) प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हेही उपस्थित होते. पक्ष प्रवेशानंतर जयंत पाटील (Jayant Patil) यांनी खडसेंचं स्वागत केलं. खडसे यांच्या प्रवेशावर काही नेते नाराज असल्याची दबक्या आवाजात चर्चा होती. खुद्द शरद पावार यांनीच आता या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या निर्णयापासूनच त्यांना प्रवेशानंतर मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार असल्याची चर्चा सुरू होती. राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांचे खातेबदल केले जाणार असल्याचीही चर्चा होती. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या या चर्चेला पवारांनी पूर्णविराम दिला आहे.

खडसेंच्या पक्षप्रवेशानंतर शरद पवार म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून माध्यमं खडसेंच्या प्रवेशाच्या बातम्या चालवत होते. आज काहीतरी वेगळंच. मध्येच काहीतरी जाहीर करून टाकलं की, अजितदादा (Ajit Pawar) नाराज आहेत. अरे कशाला नाराज आहेत.”

पुढं बोलताना पवार म्हणाले, “असं आहे की, कोरोनाच्या (Covid-19) संकटात प्रत्येकाची काळजी घ्यावी लागते. काळजी घेण्याच्या सूचना मी प्रत्येकाला दिल्या आहेत. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) व्हेंटीलेटरवर होते. राज्य सरकारमध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांना कोरोना झाला. त्यामुळं काळजी घेत आहोत. खबरदारी म्हणून काही सहकारी दिसले नाहीत. म्हणून लगेच काहीतरी गडबड झाली. काहीही गडबड झालेली नाही” असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

You might also like