Eknath Dhole Join AAP | शिवसेनेच्या एकनाथ ढोलेंचा आम आदमी पक्षात प्रवेश; ‘आप’ कडून शहर संघटक पदी नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Dhole Join AAP | मागील 32 वर्षांपासून शिवसेनेचे (Shivsena) सक्रीय पदाधिकारी म्हणून कार्यरत असणारे एकनाथ ढोले (Eknath Dhole Join AAP) यांनी आम आदमी पक्षात (AAP) प्रवेश केला आहे. एकनाथ ढोले यांची ‘आप’ च्या पुणे शहर संघटकपदी (Pune City Organizer) नियुक्ती करण्यात आली आहे. ढोले यांनी आपमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेला एक धक्का बसला आहे.

 

एकनाथ ढोले (Eknath Dhole Join AAP) मागील 32 वर्षांपासून शिवसेनेचे सक्रीय पदाधिकारी राहिले आहेत. तसेच त्यांनी 2017 मध्ये शिवसेनेकडून पुणे महानगरपालिकेची निवडणूक Pune Municipal Corporation Elections (PMC Elections) लढवली होती. एकनाथ ढोले शिवसेनेमध्ये गटप्रमुख, शाखाप्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख म्हणूनही कार्यरत होते.

 

दरम्यान, आता त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला असून आम आदमी पक्षात (AAP) प्रवेश केला आहे.
त्यांची ‘आप’ कडून शहर संघटक पदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार (Vijay Kumbhar), राज्य प्रवक्ते डॉ .अभिजित मोरे (Dr. Abhijit More),
पुणे शहर जनसंपर्क प्रमुख प्रभाकर कोंढाळकर (Prabhakar Kondhalkar),
पुणे शहर निवडणूक प्रचार प्रशासन समितीचे सुदर्शन जगदाळे (Sudarshan Jagdale), विकास सुपणार (Vikas Supnaar),
पियूष हिंगणे (Piyush Hingane) आदी उपस्थित होते.

 

 

Web Title :-  Eknath Dhole Join AAP | Shiv Sena’s Eknath Dhole joins Aam Aadmi Party Appointment as city organizer by AAP

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा