Eknath Gite | ‘देवमाणूस’ फेम अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत; अभिनेत्याने मागितली चाहत्यांची माफी

पोलीसनामा ऑनलाइन टीम : Eknath Gite | छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांनी जरी आज प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी देखील त्या मालिकेतील कलाकार आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यातलीच एक मालिका म्हणजे ‘देव माणूस’ या मालिकेतील कलाकार आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या मालिकेतूनच हे कलाकार घराघरात पोहोचले होते. यांना प्रसिद्धी मिळाली होती. अजय कुमार देव ही मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड त्याचबरोबर मालिकेत विजय शिंदे ही भूमिका चांगलीच गाजली होती. विजय शिंदे ही भूमिका अभिनेता एकनाथ गीतेने (Eknath Gite) साकारली होती. एकनाथ गीतेंनी शेअर केलेली पोस्ट सध्या चर्चेत येत आहे.

एकनाथ गीते हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अलीकडेच त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे. या निमित्ताने त्यांनी चाहत्यांचे आभार व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी शेअर केलेली फेसबुक पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे. एकनाथ गीतेने पोस्ट शेअर करत म्हटले की, “काल मी सकाळी उठून फोन पाहिले असता 78 मिस कॉल, 140 च्या आसपास इन्स्टा स्टोरी मी ॲड केल्या मात्र काही ॲड होत नव्हते तर काहींना मी कॉल देखील करू शकलो नाही, यासाठी माफ करा. तर काही फेसबुक पोस्ट देखील माझ्याकडून पाहिल्या नाही गेल्या यासाठी मी सर्वांची क्षमा मागत आहे. मी खरंच माफी मागतो सर्वांची. पण तुम्ही सर्वांनी माझ्यावर जे भरभरून प्रेम दिले आहे आणि माझा वाढदिवस स्पेशल बनवला त्यासाठी मी तुमचे ऋणी आहे. असंच प्रेम आणि आशीर्वाद कायम माझ्यासोबत राहू द्या थँक यू आणि लव्ह यू”. (Eknath Gite)

सध्या सोशल मीडियावर एकनाथ गीतेने शेअर केलेली ही पोस्ट मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे.
याआधी एकनाथ गीते यांनी ‘तू अशी जवळी रहा’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’,
‘जागते रहो महाराष्ट्र’, ‘श्री गुरुदेव दत्त’, ‘देव पावला’,
‘घेतला वसा टाकू नको’ या मालिकेतही काम केले होते.
एवढेच नाही तर त्यांनी ‘तांडव’ या चित्रपटात देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती.

Web Title :- Eknath Gite | devmanus fame vijay shinde actor eknath gite apologies to fans after celebrate birthday

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kartik Aaryan | ‘भूल भुलैय्या 3’चा टीझर आउट; ‘या’ दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

Pune Kasba Peth Bypoll Election Result | कसब्यात सर्व मित्र पक्षांची एकजूट बांधण्यात यशस्वी ठरलो, मात्र चिंचवडमध्ये…; पोटनिवडणुकीच्या निकालावर अजित पवारांची प्रतिक्रिया (व्हिडिओ)

Supreme Court | मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीवर सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निकाल, समिती नेमण्याचे आदेश