Eknath Khadse | जळगाव दूध संघाचे वातावरण तापले, पोलीस ठाण्यात आमदार एकनाथ खडसेंचा ठिय्या…

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – मंगळवारी रात्री राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार (NCP MLA) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी महाराष्ट्र – मध्यप्रदेश येथील आरटीओ (RTO) कार्यालयावर अचानक भेट दिली आणि त्यानंतर त्यांनी तेथे होत असलेला गैरप्रकार उघड केला. याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची (Suspension) करावाई देखील करण्यात आली आहे. आता त्यांनी दूध संघाचे वातावरण देखील चांगले तापले आहे. लोणी आणि बटरच्या विक्रित 1 कोटी 15 लाख रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करुन संबंधितांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यासाठी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी जळगाव पोलीस स्थानकात (Jalgaon Police Station) निरीक्षकांच्या दालनात ठिय्या मांडला. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मी येथून हलणार नाही, असा पवित्रा घेतल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.

 

ठाकरे सरकार (Thackeray Government) स्थापन झाल्यानंतर सरकारने दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. त्यानंतर आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavhan) यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तसेच प्रभारी कार्यकारी संचालक म्हणून शैलेश मोरखडे (Shailesh Morkhade) यांची निवड झाली होती. त्यानंतर बी ग्रेड तुपाची विक्री करुन 2 लाख 7 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार मोरखडे यांनी दिली होती. त्यानुसार गुन्हा देखील दाखल झाला होता. परंतु राज्य सरकारचा (State Government) निर्णय उच्च न्यायालयाने (High Court) रद्द ठरविल्याने पुन्हा पूर्वीचे संचालक मंडळ अस्तित्वात आले.

दूध संघाच्या अध्यक्ष मंदाकीनी खडसे (Mandakini Khadase) व
कार्यकारी संचालक मनोज लिमये (Manoj Limaye) यांनी बुधवारी शहर पोलीस ठाणे (City Police Station)
गाठून लोणी आणि दूध पावडरची परस्पर विक्री करुन 1 कोटी 15 लाखांचा अपहार
केल्याची तक्रार करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
परंतु गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे गुरुवारी एकनाथ खडसे यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला आहे.
संबंधितांवर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची मागणी खडसे यांनी केली आहे.

 

Web Title :- Eknath Khadase | mla eknath khadse participated in the agitation of the milk union and staged a sit in at the police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Andheri By Election | अंधेरीच्या पोटनिवडणुकीत भाजप अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण करत आहे – बाळासाहेब थोरात

Rohit Pawar | भाजप याद्या बघून काम करते, ते विद्यार्थ्यांची परिस्थिती बघत नाहीत; फी वाढीवरुन रोहित पवारांचा भाजपवर आरोप

Pune Crime | दुचाकी चोरणाऱ्या सराईताला फरासखाना पोलिसांकडून अटक, 16 दुचाकी जप्त