Breaking : एकनाथ खडसेंनी दिला भाजपाचा राजीनामा, शुक्रवारी राष्ट्रवादीमध्ये ‘एन्ट्री’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपाचे ज्येष्ठ नेते तसेच माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी अखेर भाजपाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. खडसे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) मध्ये प्रवेश करतील असं सांगण्यात आलं आहे.

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळं महाराष्ट्रातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळं जळगाव आणि परिसरातील अनेक जिल्हयांमध्ये राष्ट्रवादीची मोठी ताकद वाढणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्य प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती.

अखेर आज त्याला पुर्णविराम भेटला आहे. काही वेळापुर्वीपर्यंत भाजपाचे नेते नाथाभाऊ आम्हाला सोडून जाणार नाहीत असं म्हणत होते. मात्र, आता एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीमध्ये शुक्रवारी प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. शुक्रवारी दुपारी 2 वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.