चंद्रकांतदादा तुमचा भाजपाशी काय संबध : खडसे

पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrkant Patil ) यांच्यात आता शाब्दिक वाद रंगले आहे. एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीकडून कॅडबरी मिळते की लिमलेटची गोळी (Chocolate And Immolate) तेच बघायचं असल्याचे पाटील यांनी म्हटलं आहे. तर त्याला खडसे यांनी उत्तर जोरदार दिलं आहे. चंद्रकांतदादा तुमचा भाजपाशी संबंध काय? तुम्ही तर कुल्फी आणि चॉकलेट मिळावं म्हणून भाजपामध्ये आलात असं म्हणत खडसे यांनी पाटील यांना उत्तर दिलं आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना खडसे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाने मला काहीही फुकट दिलेलं नाही. त्यासाठी मी भाजपाला चाळीस वर्षे दिली असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. चंद्रकांत पाटील यांचा भाजपाशी संबंध तरी काय होता? चंद्रकांतदादा तुम्ही विद्यार्थी परिषदेत होतात, काहीतरी कुल्फी किंवा चॉकलेट मिळावं म्हणून तुम्ही भाजपात आलात. तुम्हाला सगळं काही फुकट मिळाल आहे. कोल्हापुरात आमदार आणि खासदार सोडाच साधा पंचायत समितीचा सदस्य तरी तुम्हाला निवडून आणता येतो का ? असा प्रश्नही खडसेंनी पाटील यांना विचारला आहे.

भाजपामध्ये माझा छळ झाला, माझी बदनामी झाली त्यामुळे मी पक्ष सोडला. काही मिळवण्यासाठी मी पक्ष सोडला नाही. माझा भूखंडाशी काहीही संबंध नाही, तरीही माझी चौकशी झाली. आता माझ्याकडे काही लोकांच्या भूखंड गैरव्यवहाराची कागदपत्रं आहेत. त्याच्या चौकशीची मागणी मी करणार आहे असंही खडसे यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले होते पाटील
खडसे यांचा राष्ट्रवादीत दुपारी २ वाजता प्रवेश घेणार होता. पण त्याला उशीर झाला अन चार वाजले. राष्ट्रवादीच खडसेंना काय द्यायचं ते ठरलेलं नाही. तुमचे समाधान होईल असं देऊ या शब्दावर नाथाभाऊ बळेबळे नरीमन पॉईंटच्या घरातून बाहेर पडले. आता तुमचं समाधान होईल यामध्ये लिमलेटच्या गोळीनेही समाधान होतं आणि कॅडबरीनेही. त्यामुळे राष्ट्रवादी आता खडसेंना लिमलेटची गोळी देणार की कॅडबरी ते बघावं लागेल.

You might also like