Eknath Khadse | ‘सरकार त्यांचंच आहे. त्यामुळे त्यांनी याचा तपास करावा.” गिरीश महाजन यांनी केलेल्या मुलाच्या मृत्यूवरच्या विधानावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया

जळगाव : पोलिसनामा ऑनलाईन – राज्याचे मंत्री, भाजप नेते गिरीश महाजन (BJP leader Girish Mahajan) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी (NCP Leader Eknath Khadse) जळगाव जिल्हा दूध संघ (jalgaon Jilha Dudh Sangh) ताब्यात घेण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मात्र आता या झुंजीला विद्रुप वळण आले आहे. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना मुलगा नसल्याचे वक्तव्य एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. महाजनांनी त्यांच्या या वक्तव्यावर पलटवार केला. ‘मला मुलगा नसला तरी दोन मुली आहेत याचा मला आनंद आहे, मात्र खडसेंना मुलगा होता त्याचं काय झालं? खडसेंच्या मुलाने आत्महत्या केली का त्याचा खून झाला हे तपासण्याची गरज आहे,’ असे अत्यंत धक्कादायक विधान गिरीश महाजन यांनी केले.

 

गिरीश महाजन (Girish Mahajan) पुढे म्हणाले, ‘खडसेंच्या अनेक ठिकाणच्या भानगडी आहेत, चौकशीमध्ये सबळ पुरावे मिळत असल्याने खडसे अस्वस्थ आहेत. त्यामुळे ते आजकाल काय बोलतात याच त्यांना भान राहत नाही. कधी ते मला चावट म्हणतात, कधी माझी बदनामी करा म्हणतात. तर कधी दगड घेऊन उभे असतात. त्यांची परिस्थिती बघता त्यांची मानसिक स्थिती बिघडणं स्वाभाविक आहे. मुख्यमंत्री लेव्हलचा माणूस असताना ते काहीही बोलत आहेत.’

 

‘तुमच्या कर्तृत्वामुळे तुमच्या मागे ईडी लागली. भोसरीमध्ये तुम्ही काय काय केलं हे समोर येतंय, बाकीच पण लवकरच समोर येईल.
तुमचा जावई 17 महिने झाले भोसरी (Bhosari Corruption Case) प्रकरणात जेलमध्ये आहे,
त्याचा जामीन तुम्ही का करत नाही? माझ्यावर खडसेंनी मोक्का लावला हे सांगायची गरज नाही.
खडसे, वकील प्रविण चव्हाण (Pravin Chavan), पोलीस अधिकाऱ्यांनी रचलेलं षडयंत्र पेन ड्राईव्हने समोर आलं आहे.
आता ज्याने मला मला मोक्का लावला त्याची आणि खडसेंची ईडी चौकशी होत आहे. आता दूध का दूध पाणी का पाणी होईल,’ असा इशारा गिरीश महाजनांनी दिला होता.

मात्र, गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) मुलाच्या मृत्यूबद्दल बोलून राजकीय मर्यादा ओलांडल्या.
त्यावर आता एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया आली आहे. “गिरीश महाजन यांना सध्या काय बोलावं, हे सुचत नाही.
मी कधी एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण केलं नाही. माझ्या मुलाची हत्या झाली की आत्महत्या झाली,
हे तपासायला माझी काही हरकत नाही. केंद्रात आणि राज्यात त्यांचंच सरकार आहे. त्यामुळे त्यांनी याचा तपास करावा.
परंतु, असे आरोप करणे चुकीचे आहे.” असे खडसे यांनी म्हटले आहे.

 

Web Title :- Eknath Khadse | bjp leader girish mahajan has raised a question about the suicide of ncp leader eknath khadse son

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nitin Gadkari | राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Govinda Naam Mera | अखेर ‘गोविंदा नाम मेरा’चा ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलरमध्ये सयाजी शिंदे यांची झलक

Pune Pimpri Crime | पैसे दुप्पट करुन देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरीकाला घातला 33 लाखांचा गंडा, बावधन मधील घटना