×
HomeशहरजळगावEknath Khadse | एकनाथ खडसेंना भाजपचा आणखी एक धक्का

Eknath Khadse | एकनाथ खडसेंना भाजपचा आणखी एक धक्का

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जळगाव दूध संघाच्या निवडणुकीची (Jalgaon Dudh Sangh Election) सध्या रणधुमाळी आहे. त्यात जळगाव दूध संघ महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) ताब्यातून काढून घेण्यास भाजप (BJP) जंग पछाडत आहे. त्यामुळे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. भाजपने एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना आणखी एक धक्का दिला आहे.

 

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत चाळीसगावचे भाजपा आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांनी खडसेंविरोधात मुक्ताईनगर येथून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याविरोधात एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे मंगेश चव्हाण यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आमदार मंगेश चव्हाण यांना मुक्ताईनगरमधून निवडणूक लढविता येणार नाही, असा दावा एकनाथ खडसेंनी केला होता. याविरोधात मंदाकिनी खडसे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज (दि. 16) सुनावणी झाली.

 

मागील काही काळात जळगाव दूध संघ चर्चेच्या केंद्रस्थानी होता.
कारण या संघात भ्रष्टाचार आणि पैश्यांचा अपहार झाल्याची तक्रार संचालक महेश लिमये (Mahesh Limaye) यांनी केली होती.
या संघाच्या संचालिका एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आहेत.
त्यामुळे त्यांच्यामागे या चौकशीचे शुक्लकाष्ठ लागले होते. एकनाथ खडसे यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत.
त्यांनी भाजपला मैदानात येऊन सामना करण्यासाठी सांगितले आहे. तसेच निवडणुका तोंडावर असल्याने भाजपने हा विषय काढला असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

 

Web Title :- Eknath Khadse | court rejected the petition filed by mandakini khadse against mla mangesh chavan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Prakash Ambedkar | मुख्यमंत्री भेटून गेल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी साधला माध्यामांशी संवाद, म्हणाले…

Eknath Khadse | साधना महाजन तुमच्या कुटुंबातीलच आहेत ना? – एकनाथ खडसे

Urfi Javed | आंतरराष्ट्रीय ग्लॅमर वर्ल्डमध्ये चालली उर्फी जावेदची जादू, होतेय टेलर स्विफ्टच्या फॅशनची चर्चा

Must Read
Related News