राष्ट्रवादीत प्रवेश जाहीर होताच एकनाथ खडसेंनी सर्वात प्रथम ‘हे’ काम केलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आपला पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश निश्चीत झाला. खडसे शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीमध्ये (NCP) प्रवेश करणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगलेल्या या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी पत्रकार परिषद घेत शिक्कामोर्तब केले. यानंतर एकनाथ खडसे यांनी सर्वात प्रथम आपलं ट्विटर अकाउंट डिलीट केलं आहे. @EknathKhadseBJP हे व्हेरिफाइड ट्विटर अकाउंट डीलीट करत खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची तयारी सुरु केली आहे.

दरम्यान खडसे @EknathKhadse हे ट्विटर अकाउंट वापरत असून त्यानी आपण राजीनामा दिल्याची अधिकृत पोस्ट केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे ट्विट रिट्विट देखील केलं आहे. खडसे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आज बुधवार, दिनांक 21 ऑक्टोबर 2020 रोजी मी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, खडसे यांनी ट्विटमध्ये चंद्रकांत पाटील यांना टॅग केलं आहे.

एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, मी कोणावरही नाराज नाही. मी फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याचे सांगत त्यांनी फडणवीस यांच्यावर तोफ डागली. भाजप सोडताना खंत आहे. मला पक्षातून ढकलून लावलं. महिलेला माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला सांगितला, फडणवीसांनी मनस्ताप दिला. बहुजन समाजाचा मुख्यमंत्री असला पाहिजे, या माझ्या वक्तव्यानंतर जे घडलं ते महाराष्ट्राला माहिती आहे. एसीबी (ACB) चौकशी, भूखंड प्रकरण, दमानिया यांनी विनयभंगाचा खोटा खटलाही दाखल केला. पोलिसांच्या नकारानंतरही देवेंद्रजींनी सांगितल्याने खटला नोंदवला गेला, अशी टीका खडसे यांनी फडणवीस यांच्यावर केली.