जळगाव: पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे आमदार आणि विद्यमान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यात पुन्हा वाद पेटला आहे. यावेळी हे दोघेही ऐकेरीवर आले आहेत. नोट बंदीच्या काळात तुम्ही काय केले, हे सर्वांना माहीत आहे. मला जास्त बोलायला लाऊ नका, असा इशारा गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना (Eknath Khadse) दिला आहे.
त्यावर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा देखील पारा चढला आहे. त्यांनी गिरीश महाजन यांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘आतापर्यंत तुझी जबान चूप का राहिली, कोणाचा दबाव होता? काय शोधायचे ते शोधून काढा’, असा जोरदार पलटवार एकनाथ खडसेंनी केला.
एकनाथ खडसे यांनी नोटबंदीच्या काळात कशा प्रकारे नोटा बदलून घेतल्या हे सर्व मला माहीत आहे. मला जास्त बोलायला लाऊ नका, असा इशारा गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दिला होता. त्यावरुन दोघांचे पुन्हा वाद सुरु झाले आहेत. एकनाथ खडसेंनी देखील ते एवढे दिवस शांत का होते, त्यांच्यावर कुणाचा दबाव होता, असे प्रश्न गिरीश महाजन यांना केले आहेत. मी कोणाला घाबरत नाही, तुम्हाला काय शोधायचे ते शोधून काढा, असा पलटवार एकनाथ खडसेंनी केला आहे.
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचे वाद संपूर्ण जळगाव जिल्ह्याला माहीत आहेत.
कधी ते घराणेशाहीवर भांडतात, तर कधी जळगाव दूध संघाच्या निवडणुकीवर भांडतात.
ते सतत वादात असतात. त्यामुळे त्यांचे वाद जिल्ह्याला नवीन नाहीत.
Web Title :- Eknath Khadse | eknath khadse criticizes bjp leader girish mahajan
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Meena Deshmukh | दुर्देवी ! ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे अपघाती निधन