Eknath Khadse | ‘गाफील राहिल्याने राज्यसभेत पराभव, विधानपरिषदेला ताकही फुंकून पिण्याची गरज’ – एकनाथ खडसे

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यसभा निवडणुकीतील (Rajya Sabha Election) पराभवानंतर महाविकास आघाडीतील नेते सावध झाले आहेत. आता ज्येष्ठे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनीही याबाबत सल्ला दिला आहे. खडसे हे अंबरनाथमध्ये एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी आले असताना पत्रकारांशी बोलताना एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रतिक्रिया दिली की, राज्यसभा निवडणुकीत गाफील राहिल्याने पराभव झाला. मात्र, विधानपरिषदेला (Vidhan Parishad Election)  ताकही फुंकून प्यावे लागण्याची आवश्यकता आहे.

 

एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुढे म्हणाले की, राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही बरंच काही शिकलो. जो ओव्हर कॉन्फिडन्स (Overconfidence) होता, किंवा ज्याप्रमाणे दुर्लक्ष झाले तसे आता करता कामा नये, ही एक शिकवण आम्हाला त्यातून मिळाली. मात्र, शेवटी पराभव हा पराभव असतो. तो शिवसेनेचा (Shivsena) जरी झाला तरी महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) पराभव म्हणून तो जिव्हारी लागल्यासारखा आहे.

खडसे म्हणाले, आता विधानपरिषदेला दूध पिण्याच्या आधी ताकही फुंकून प्यावे लागेल, तशाप्रकारे आता विधानपरिषदेची तयारी करत असताना प्रत्येक गोष्ट तपासून आणि विश्वासाने करण्याची आवश्यकता आहे. ते पुढे म्हणाले की, आता काळजीपूर्वक लक्ष देऊन विजय संपादित करायचा आहे. त्यामुळे सर्वांनी आता मागच्या पराभवाचा धडा घेऊन विधानपरिषदेसाठी रणनीती आखण्याचे ठरवले आहे.

 

Web Title :- Eknath Khadse | eknath khadse says we should work very carefully
for vidhan parishad after the rajya sabha defeat

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा