Eknath Khadse | ‘सध्या विरोधकांना शत्रूसारखं वागवलं जातं’, एकनाथ खडसेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सध्या विरोधकांना शत्रु सारखे वागवलं जात आहे. त्यांच्यामागे ईडी (ED), सीबीआय (CBI) यासारख्या तपास यंत्रणा लावल्या जात असल्याची टीका राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे. तसेच तपास यंत्रणा पाठिमागे लावून विरोधकांना छळले जात आहे, असा आरोप एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला. ते माध्यमांशी बोलत होते.

सध्या राज्यामध्ये जाती-पातीच्या राजकारणाबाबत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, प्रत्येक पक्षात राजकीय जातीवाद फोफावला आहे. याला कोणताही पक्ष अपवाद नाही. मात्र जातीभेदापेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे समोर जे विरोधक आहेत, त्यांना शत्रूसारखं वागवलं जात असल्याचे खडसे यांनी सांगितले.

एकनाथ खडसे पुढे म्हणाले, विरोधी पक्षात असलेला नेता हा आपला शस्त्रू आहे, असं समजून त्याच्यामागे ईडी,
सीबीआय, सीआयडी (CID) किंवा एसीबी (Anti Corruption Bureau (ACB) अशा तपास यंत्रणांची चौकशी लावली जाते. अशा प्रकारे विरोधकांना छळण्याचे प्रकार घडत असून विरोधकांना नाउमेद करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप खडसे यांनी केला.

Web Title : Eknath Khadse | eknath khadse statement on ed cbi cid acb raid on opposition leaders treat like enemy

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Government Employees Strike | सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे, जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक

Ajit Pawar | संजय गायकवाडांच्या शासकीय कर्मचाऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन अजित पवार संतप्त, म्हणाले- ‘…तर राज्य चालवणं कठीण होईल’ (व्हिडिओ)

Bhaskar Jadhav | ‘रामदास कदम कोकणातील जोकर’, भास्कर जाधवांनी उडवली ‘त्या’ विधानाची खिल्ली

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | ’95 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांच्याकडे हरामची कमाई’, यासारखी वादग्रस्त वक्तव्ये सत्ताधारी आमदारांना शोभतात का? – अजित पवार