Eknath Khadse | मी 50 खोके घेऊन दुसर्‍या पक्षात जाणारा माणूस नाही, एकनाथ खडसे म्हणाले – अमित शाह आणि फडणवीसांना मी भेटणारच… माझ्यासोबत…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे काही दिवसांपूर्वी त्यांच्या स्नूषा रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्यासमवेत दिल्लीत गृहमंत्री अमित शहांच्या (Home Minister Amit Shah) भेटीसाठी गेले होते. यानंतर खडसे पुन्हा भाजपामध्ये (BJP) जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यावर स्पष्टीकरण देऊन खडसे यांनी विषय संपवला होता. मात्र आज गिरिश महाजन (Girish Mahajan) यांनी खडसेंना डिवचले. अमित शाहांनी एकनाथ खडसेंना (Eknath Khadse) भेट नाकारली, त्यांना तीन तास कार्यालयाबाहेर प्रतीक्षा करायला लावली, खडसे म्हणत होते एकत्र बसून विषय मिटवू, खडसेंनी सबुरीने घ्यावे, अशी टीका महाजनांनी केली होती. यावर आता खडसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

जळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, मी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमवेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भेटणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचीही मी भेट घेणार आहे. यामध्ये कोणताही राजकीय विषय नाही. अन्य एका विषयासंदर्भात मला दोघांशीही चर्चा करायची आहे. अमित शाहांना भेटायला जाताना शरद पवारच माझ्यासोबत असणार आहेत. त्यामुळे मी भाजपात जाणार आहे, अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका. मी 50 खोके घेऊन दुसर्‍या पक्षात जाणारा माणूस नाही.

 

एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुढे म्हणाले, अमित शाहांची भेट घेण्यासाठी मी त्यांच्या कार्यालयाबाहेर तीन तास थांबलो, असे वक्तव्य गिरीश महाजनांनी केले आहे. ही माहिती रक्षाताई खडसेंनी आपल्याला दिल्याचा दावा गिरीश महाजनांनी केला. मात्र, याबाबत मी रक्षाताईंशी चर्चा केली, पण त्यांनी अशी कुठलीही माहिती दिली नाही. त्यांनी केवळ एवढेच सांगितले की, आम्ही अमित शाहांची भेट घ्यायला गेलो होतो. पण आमची भेट झाली नाही.

खडसे म्हणाले, अमित शाहांची भेट घेण्याबाबतची पूर्वकल्पना मी शरद पवारांना आधीच दिली होती.
गर्दीमुळे तुमची भेट झाली नसेल तर मी स्वत: तुमच्यासोबत येतो.
आपण दोघे जाऊन अमित शाहांची भेट घेऊ, असे शरद पवारांनी मला सांगितले आहे.
त्यामुळे याबाबत गैरसमज होण्याचा प्रश्नच नाही, असा खुलासा खडसे यांनी केला.

 

Web Title :- Eknath Khadse | eknath khadse statement on speculation of joining bjp and meeting with amit shah

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Lumpy Skin Disease | ‘मोदींनी नायजेरियातून आलेल्या चित्त्यांमुळे लम्पी आजार पसरला’ काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा अजिब आणि हास्यास्पद दावा

Udayanraje Bhosale | रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून पवार शिक्षण संस्था करा : उदयनराजे भोसले

MNS On Shivsena | मनसेची शिवसेनेवर टीका, शिवतीर्थावरच्या टोमणे मेळाव्यासाठी मांडवली झाली म्हणे… मी तुझ्याकडे, तू माझ्याकडे गर्दी कर