Eknath Khadse | खडसेंच्या पाठीमागे पुन्हा चौकशीचा फेरा? भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळ्याची पुन्हा होऊ शकते चौकशी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्यावर झालेला घोटाळ्याचा आरोप राजकीय सूडापोटी झाल्याचा आरोप एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपात (BJP) असतानाच अनेकदा केला होता. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून अखेर खडसे (Eknath Khadse) हे राष्ट्रवादीत (NCP) आल्यानंतर त्यांनी आक्रमक भूमिका घेत राज्यातील भाजपा नेत्यांवर जोरदार टीका सुरू केली आहे. आता भोसरी भूखंड घोटाळा प्रकरण (Bhosari MIDC Land Case) थंड बस्त्यात जाणार असे वाटत असतानाच ते पुन्हा बाहेर आले आहे.

भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची पुन्हा चौकशी होणार होणार आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundagarden Police Station) एकनाथ खडसे यांच्यावर एसीबीने (Anti Corruption Bureau) गुन्हा (FIR) दाखल केला होता. या प्रकरणी एकनाथ खडसे यांची चौकशी झाल्यानंतर तपासी अधिकार्‍यांनी क्लोजर रिपोर्ट (Closure Report) न्यायालयात सादर केला होता.

दरम्यान, तक्रारदाराने आक्षेप घेतला की ज्या बाबींची चौकशी करण्याची मागणी केली होती, त्याचा तपास झालेला नाही. यामुळे न्यायालयाने पुन्हा दिवाळीनंतर कागदपत्रे मिळताच तपास करण्याच्या सूचना दिल्याआहेत.

न्यायालयाने दिवाळीनंतर कागदपत्रे मिळताच पुन्हा तपास करण्याच्या सूचना दिल्याने राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळ्याप्रकरणी चौकशीच्या फेर्‍यात अडकणार आहेत.
चौकशीत क्लीनचिट मिळेल अशी खडसे यांना खात्री होती, मात्र नव्याने तपास केला जाणार असल्याने खडसे
यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम असणार आहे.

भाजपा-शिवसेना युती (BJP-Shiv Sena Alliance) सरकारमध्ये एकनाथ खडसे मंत्री असताना मंत्रीपदाचा फायदा
घेत त्यांनी भोसरी येथे भूखंड लाटल्याचा आरोप करण्यात आला होता.
या घोटाळाप्रकरणी खडसे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता, त्यात खडसे यांच्यासह त्यांच्या नातलगांची चौकशी
झाली होती. पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता,
त्यानुसार विविध यंत्रणांकडून खडसे यांची चौकशी सुरू होती. त्यानंतर न्यायालयात एकनाथ खडसे यांच्याबाबतचा
क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता.

Web Title :-  Eknath Khadse | eknath khadse will be interrogated again in bhosari land scam case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ambadas Danve | उद्धव ठाकरेंना घाबरुन ते तिघे एकत्र येतील, पण…,  ठाकरे-शिंदे-फडणवीसांच्या भेटीवर अंबादास दानवेंचा टोला

MLA Vaibhav Naik | दिवाळीच्या उत्सवात कोकणातलं राजकीय वातावरण तापलं, वैभव नाईकांनी दिलं निलेश राणेंना ‘हे’ आव्हान