अंजली दमानियांचा पलटवार, म्हणाल्या – ‘एकनाथ खडसे माझ्याबद्दल अत्यंत अश्लील भाषेत बोलले होते !’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –    सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला होता असं भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी म्हटलं होतं. आता दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी खडसेंवर पलटवार केला आहे. एकनाथ खडसे माझ्याबद्दल अत्यंय अश्लील भाषेत बोलले होते असं त्या म्हणाल्या आहेत.

अंजली दमानिया म्हणाल्या, एकनाथ खडसे हे जळगावमध्ये पत्रकार परिषदेत धादांत खोटं बोलत होते. खडसे माझ्या विरोधात अत्यंत खालच्या भाषेत बोलले होते. तुम्हाला जिथं जायचं तिथं जा पण मी तुम्हाला सोडणार नाही असंही त्या म्हणाल्या आहेत.

दमानिया पुढं म्हणाल्या, “एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजप (BJP) किंवा राष्ट्रवादी (NCP) यांच्या राजकारणाबद्दल मला काहीही देणंघेणं नाही. खडसे हे खुनशी प्रवृत्तीचे नेते आहेत. त्यांनी माझा आतोनात छळ केला आहे.”

दमानिया म्हणाल्या, 3 सप्टेंबर रोजी वाढदिवसाच्या दिवशी झालेल्या सभेत माझ्याबद्दल अश्लील वक्तव्य केलं होतं. त्याचे व्हिडीओ आणि ऑडिओ माझ्याकडे आले होते. त्याचे हे व्हिडीओ मी वाकोला पोलीस ठाण्यात (Vakola Police Station) घेऊन गेले होते. त्यावेळी पोलिसांनी 501 कलमाखाली गुन्हा दाखल केला होता. ते अत्यंतं खालच्या स्तराला जाऊन बोलत होते असा खुलासा त्यांनी केला होता.

देवेंद्र फडणवीस यांना फक्त सोयीचं राजकारण करायचं होतं. नेहमी सामाजिक कार्यकर्त्यांबद्दल अशा प्रकारचं राजकारण करण्यात आलं असं म्हणत दमानिया यांनी फडणवीसांवर टीका केली होती.

दमानिया यांनी असंही सांगितलं की, खडसे म्हणाले होते की, मी खोट्या तक्रारीबद्दल फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी दमानिया गोंधळ घालत होत्या म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता असं सांगितलं. मी फडणवीस यांना विचारू इच्छिते की, अमृता फडणवीस (Amruta Fadnavis)यांच्याबद्दल असं वक्तव्य केलं असतं तर तुम्ही असंच बोलले असते का असा सवालही दमानिया यांनी केला आहे.

खडसे यांच्याबद्दलचा खटला अजून संपलेला नाही. पुढं त्यांनी जर कोणत्याही पत्रकार परिषदेत माझ्याबद्दल काहीही वक्तव्य केलं तर मी तुम्हाला सोडणार नाही असा इशाराही दमानियांनी दिला आहे.

You might also like