Eknath Khadse | ‘तू माझ्यामागे ईडी लावली, म्हणून तुझ्यामागे मी मोक्का लावला’, एकनाथ खडसेंचा  खळबळजनक गौप्यस्फोट

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजप नेते गिरीश महाजन (BJP Leader Girish Mahajan) यांच्यातील राजकीय वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या मुद्यावर सतत वाद होत असतात. आता पुन्हा एकदा एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गिरीश महाजन यांचे नाव घेत गौप्यस्फोट केला आहे. यातून सत्तेत येणारा पक्ष तपास यंत्रणेचा कशाप्रकारे गैरवापर करतो याची चर्चा सध्या सुरु आहे.

म्हणून तुझ्यामागे  मोक्का लावला

एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले, गिरीश महाजन यांनी माझ्यामागे सर्व यंत्रणा लावल्या, ईडी चौकशी (ED Inquiry) लावली. माझी सीबीआय चौकशी (CBI Inquiry) सुरु केली आणि उलट मला विचारतो की माझ्या मागे मोक्का (MCOCA) Mokka,का लावला? तू माझ्यमागे ईडी लावली, म्हणून तुझ्यामागे मी मोक्का लावला, असं खळबळजनक विधान खडसे यांनी केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सरकारी यंत्रणांचा वापर करुन दबाव

राज्यातील राजकारणात सरकारच्या (Maharashtra Politics News) विरोधात बोलणाऱ्या विरोधात ईडी लावली जाते. त्याच्याविरोधात सीबीआय आणि इतर सरकारी यंत्रणांचा वापर करुन दबाव आणला जातो, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. गिरीश महाजन यांचा एकेरी उल्लेख करत गिरीशने तर माझ्या मागे सर्व यंत्रणा लावल्या. सरकारमध्ये असताना एवढा माज येणं बरोबर नाही, हा माज फार काळ टिकत नाही, असं म्हणत खडसेंनी महाजन यांना सुनावलं. आता तर न्यायालयाने मला मालमत्ता जप्तीची नोटीस दिल्याचं खडसेंनी सांगितलं.

नाहीतर पेन्शवर जगला असता

एकनाथ खडसे म्हणाले, गिरीश महाजन यांना आम्हीच मोठे केले हे संपूर्ण जामनेर तालुक्याला माहित आहे. गिरीश महाजन एका चांगल्या शिक्षकाचा मुलगा आहे, म्हणून त्यांना आम्ही वर आणण्याचा प्रयत्न केला. नाहीतर वडिलांच्या पेन्शनवरच जगले असते.

माझ्यामुळेच महाजन वाचले

फर्दापूरच्या एका प्रकरणात मी आलो म्हणून गिरीश महाजन वाचले नाहीतर…
त्यावेळी कोणत्या अवस्थेत गिरीश महाजन होते, ती महिला कोणत्या अवस्थे होती, ते मी पाहिले होते.
पोलीस निरीक्षकाने महाजनांच्या कानाखाली लगावली होती. मी होतो म्हणूनच ते वाचले, मात्र माझी चूक झाली.
त्यावेळेस सोडलं नसतं तर आज आतमध्ये असते, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.

 

Web Title :  eknath khadse hit back to bjp leader girish mahajan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा