‘तुमच्यासह भाजपचे किती आमदार, खासदार पक्ष सोडणार ?’, नाथाभाऊंनी सांगितला आकडा

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी अखेर पक्षाला सोड चिठ्ठी दिली आहे. खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा केल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले. त्यानंतर आता भाजप सोडणाऱ्या खडसे यांच्या सोबत त्यांचे समर्थक असलेले किती आमदार व खासदार जाणार (how-many-mlas-mps-will-leave-bjp) याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे .दरम्यान आपल्या सोबत किती आमदार व खासदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार याची माहिती खुद्द खडसे यांनी प्रसार माध्यमांना दिली.

खडसे म्हणाले की, भाजपावर आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर माझी नाराजी नाही. माझी नाराजी केवळ देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर आहे. त्यांच्यामुळेच मी पक्ष सोडत आहे. मी येत्या शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत किती आमदार व खासदार प्रवेश करणार आहेत, असे विचारले असता ते म्हणाले की, माझ्यासोबत एकही आमदार किंंवा खासदार नाही. मी एकटाच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. रक्षा खडसे या भाजपमध्येच राहणार आहेत. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज असलेले खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. ते शुक्रवारी (दि. 23) दुपारी वाजता मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करतील, माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी दिली.