एकनाथ खडसेंचा महाजनांना टोला; म्हणाले – ‘मी कुणाचे पाय चाटले नाहीत, ना हांजी-हांजी केली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ खडसेंनी भाजपला रामराम करून राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं आहे. यानंतर खडसे आणि भाजपचे गिरीश महाजन यांच्यात सतत राजकीय वाद होत आहे. जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसापासून एक ऑडिओ क्लीप प्रसारित होत आहे. यावरून आता खडसे आणि भाजपचे गिरीश महाजन यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहे.

एकनाथ खडसे म्हणाले, गिरीशभाऊला मीच राजकारणात आणलंय, मी आर्थिक मदत केलीय, प्रचारासाठी गल्लोगल्ली फिरलोय. म्हणून ते आजा याठिकाणी दिसत आहेत. माझा दोष एवढाच आहे की, मी कधी कुणाचे पाय चाटले नाहीत, कुणाची हांजीहांजी केली नाही, ती मला सवयही नाही. आपण अनेकांना घडवतो, अनेक लोकं प्रामाणिक राहतात, असे खडसे गिरीश महाजनांवर टोला लगावला आहे. तर एका युवकाने राष्ट्रवादीचे एकनाथ खडसेंना फोन करून पिण्याच्या पाण्याची समस्या मांडली होती. हा युवक जामनेर तालुक्यातील वडगाव गावातील होता. यावररून एकनाथ खडसेंनी तुमचे आमदार गिरीश काय करतात? इकडे तिकडे बायकांच्या मागे फिरतो का? त्यावर युवकाने महाजन हे कॉल घेत घेत नाहीत. असं म्हटलं. त्यावरून तो केवळ पोरींचे फोन उचलतो असा टोला सुद्धा खडसेंनी लगावला होता.

तसेच, ही ऑडिओ क्लीप जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले. यावरून एका पत्रकाराने या ऑडिओची सहानिशा करण्यासाठी एकनाथ खडसेंना फोन केला तेव्हा तो ऑडिओ माझाच असल्याचं खडसेंनी स्पष्ट केले आहे. तर या ऑडिओ क्लीपवर उत्तर देताना भाजपचे गिरीश महाजनांनीही खडसेंना फटकारलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत असलेल्या व्यक्तीनं एका शाळकरी मुलाशी कसं बोलायला हवं? याचे भानही राहिलेले नाही. किमान त्याचा विचार तरी व्हायला हवा होता. एकनाथ खडसे वैफल्यग्रस्त झालेत. त्यांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यामुळे मला आता त्यात लक्ष घालावचं लागेल. खडसेंचा इलाज मलाच करावा लागणार आहे. असं भाजपचे गिरीश यांनी सांगितलं आहे. मुख्यतः तर गिरीश महाजनांच्या या वक्तव्यानंतर खडसेंनी पुन्हा एकदा महाजन यांचावर खोचकी टीका केलीय.

या दरम्यान, पाणी सोडून आमदार पश्चिम बंगालमध्ये फिरत होते. ३५ दिवस आमदार मतदारसंघात नव्हते, लोकांना प्यायला पाणी नाही म्हणून त्यांनी संताप व्यक्त केला. गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील लोकांनी गेल्या महिनाभरापासून माझ्याकडे तक्रार केली. पिण्याचं पाणी नाही, हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध होत नाही. आपली जबाबदारी सोडून तीन तीन आठवडे पश्चिम बंगालमध्ये प्रचार करायला जाणं कितपत योग्य आहे का? असा सवाल एकनाथ खडसेंनी विचारला होता.