Eknath Khadse | “झुंड मे तो गिधाड आते हैं, शेर तो अकेला आता है…”; मंदाकिनी खडसेंना पाडण्यासाठी एकवटलेल्या विरोधकांना एकनाथ खडसेंचा टोला

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन : “मी इतका पावरफुल आहे की, माझ्यामुळे खूप जणांना भिंगरी लागली आहे, असे म्हणत आमदार एकनाथ खडसे यांनी दूध संघ निवडणुकीत विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या राजकारणावर टीका केली आहे. तसेच, जय-पराजय हा नंतरचा विषय आहे, पण तुम्हाला मी एकटाच पुरेसा आहे”, असे म्हणत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विरोधकांना आव्हान दिले आहे. जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंची (Eknath Khadse) बायको मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) उभ्या असून त्यांना पडण्यासाठी भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे गटाने (Eknath Shinde Group) त्यांची संपूर्ण शक्ती वाहून घेतली आहे. एकनाथ खडसे त्यासंबंधी बोलत होते.

 

राज्याचे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या जामनेर (Jamner) मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) भटक्या विमुक्त जाती सेलचा मेळावा पार पडला. यावेळी भाषणात एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यासह भाजपवर जोरदार हल्ला चढवला. “जळगाव जिल्हा दूध संघाच्या (Jalgaon Dudh Sangh) निवडणुकीत मंदा खडसे यांना पाडण्यासाठी दोन मंत्री, भाजपचे सर्व आमदार-खासदार कामाला लागले आहेत. झुंड मे तो गिधाड आते हैं, शेर तो अकेला आता है….” असे आत्मविश्वासाने भरलेले वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले आहे.

दूध संघ ताब्यात घेण्यासाठी खडसे आणि गिरीश महाजन या दोघांनी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यासह सात आमदार हे एकनाथ खडसे यांच्या विरोधात उभे केले आहेत.
त्यामुळे एकनाथ खडसे एकटे पडल्याचे चित्र आहे. तरी त्यांची सहकार क्षेत्रावर चांगली पकड आहे.
त्यामुळे भाजप-शिंदे गटासाठीही लढाई सोपी असणार नाही.

 

Web Title :- Eknath Khadse | jalgaon dudh sangh election ncp eknath khadse manda khadse reaction on bjp girish mahajan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maha Vikas Aghadi | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पदवीधर सिनेट निवडणुकीत महाविकास आघाडी विजयी

Pune PMC – PM Awas Yojana | पंतप्रधान आवास योजना बंद झाल्याने यापुढील काळात या योजनेअंतर्गत नवीन प्रकल्प नाही

BMC Elections | BMC च्या प्रभागाच्या संख्येवरून आता पालिका आणि राज्य निवडणूक आयोग नोंदवणार जबाब; उच्च न्यायालयाचे याचिका सुनावणीवेळी आदेश