Eknath Khadse | गिरीश महाजन पुन्हा किंगमेकर ! 20 पैकी 16 जागी विजय; खडसे म्हणाले – ‘विरोधकांनी खोक्याची ताकद लावली’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी जळगाव जिल्ह्यातील दूध संघाची निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले. जिल्हा दूध संघाची निवडणुक ही सहकार क्षेत्रातील एक महत्वाची निवडणूक होती, त्यासाठी शनिवारी मतदान झाले. आता, या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. (Eknath Khadse)

 

या निवडणुकीमध्ये भाजपचे गिरीश महाजन यांच्या शेतकरी पॅनलने २० पैकी १६ जागा जिंकून एकनाथ खडसेंच्या सहकार पॅनेलचा दारुण पराभव केला आहे. यातील सर्वात मोठा पराभव म्हणजे एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) पत्नी मंदाकिनी खडसेंचा भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेला पराभव. एकनाथ खडसेंच्या विरोधात लढण्यासाठी भाजपने त्यांची संपूर्ण शक्ती पणाला लावली होती. या मैदानात एकनाथ खडसेंविरोधात ७ आमदार रिंगणात होते. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दोन्ही गटांकडून एकमेकांवर प्रचंड चिखलफेक करण्यात आली होती.

 

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत पराभवानंतर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे यांनी या निवडणुकीत त्यांच्या पॅनेलचा झालेला पराभव मान्य केला. विरोधकांनी खोक्याची ताकद लावली होती, असे ते म्हणाले. विरोधकांनी ही निवडणूक आर्थिक बळावर जिंकल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे.

 

जळगाव सहकारी दूध संघाचे आता पर्यंतचे निकाल

गिरीश महाजन यांचे स्विय सहायक अरविंद देशमुख विजयी, त्यांचे प्रतिस्पर्धी जिल्हा बँकेचे माजी संचालक विजय पाटील पराभूत

एकनाथ खडसे यांच्या सहकार पॅनलचे पराग मोरे ओबीसी मतदारसंघातून विजयी, पराग मोरे हे माजी खासदार वसंतराव मोरे यांचे चिरंजीव आहेत, मोरे यांच्या विरोधात गोपाळ भंगाळे उमेदवार होते

भाजपा आमदार संजय सावकारे एससी मतदार संघातून विजयी, प्रतिस्पर्धी श्रावण ब्रम्हे पराभूत

महिला राखीव मतदार संघातून राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या पत्नी छाया देवकर विजयी,

महिला राखीव मतदार संघात एकनाथ खडसे यांच्या सहकार पॅनल सोबतच गिरीश महाजन यांच्या शेतकरी पॅनलला एक जागा मिळाली आहे, त्यात पूनम पाटील विजयी झाल्या आहेत

शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील पारोळा तालुका मतदारसंघातून विजयी, त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील पराभूत

धरणगाव तालुका मतदासंघात गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्या शेतकरी पॅनलचे संजय पवार विजयी, त्यांचे प्रतिस्पर्धी वाल्मीक पाटील पराभूत.
संजय पवार हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी असूनही त्यांनी राष्ट्रवादी ऐवजी महाजन-पाटलांच्या शेतकरी पॅनलमधून निवडणूक लढवली आहे.

 

अमळनेर तालुका मतदासंघात राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील विजयी, त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ पराभूत.

 

 

Web Title :- Eknath Khadse | jalgaon dudh sangh elections result victory of
bjp shinde group defeat of ncp leader eknath khadse group

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा