‘टायगर अभी जिंदा है… पिक्चर अभी बाकी है,’ राष्ट्रवादीच्या नेत्याची भाजपावर टोलेबाजी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर पक्षांतर करत शुक्रवारी (दि. 23) राजकीय सीमोल्लंघन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश (Eknath Khadse Join Ncp ) केला. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (Jayant Patil Slam Bjp Leadership) खडसेंवर झालेल्या राजकीय अन्यायावर भाष्य करत भाजपावर टोलेबाजी केली. खडसे 40 वर्षांपासून पक्षात काम करत आहे. पण, पहिल्या रांगेतील नेत्याला भाजपाने सभागृहात शेवटच्या रांगेत नेऊन बसवले. खडसे साहेबांवर अन्याय झाला. त्यांच्या अन्यायबाबत सर्वाधिक मीच बोललो असेल. मी सभागृहातही प्रश्न विचारला होता. कटप्पाने बाहुबलीला का मारलं, असं मी त्यावेळी विचारलं होतं. याचं उत्तर आजही मिळालं नाही. आजही ते (भाजपा नेते) टिव्हीवर कार्यक्रम बघत असतील. त्यांना आता कळलं असेल टायगर अभी जिंदा है, अशी टोलेबाजी करत पाटील यांनी भाजपा नेत्यांना चिमटे काढले.

खडसे यांच्या राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आज शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला. या कार्यक्रमाच्या सुरूवातीला बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, शरद पवार यांनी आधीच सोशल डिस्टन्सिंग पाळून कार्यक्रम घेण्याची सूचना केली होती. त्यामुळे आत केवळ 50 खुर्च्या मांडल्या होत्या. मात्र, कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे प्रचंड गर्दी झाली. त्याबद्दल मी शरद पवार यांची दिलगिरी व्यक्त करतो, असं पाटील म्हणाले. शरद पवार यांच्याकडून आम्ही महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण शिकलो. यशवंतराव चव्हाण यांनी हे राजकारण महाराष्ट्रात रुजवलं. मात्र, महाराष्ट्रात मागील4-5 वर्षात विरोधकांना अडचणीत आणण्याचं राजकारण महाराष्ट्राने पाहिल असल्याचे जयंत पाटील म्हणाले.