सुप्रिया सुळेंनी अखेर अशी घ़डवली, अजितदादा आणि ख़डसेंची भेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse joins NCP) यांनी अखेर शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. राष्ट्रवादीतले सगळे दिग्गज नेते या पक्षप्रवेश सोहळ्याला उपस्थित होते, अपवाद फक्त उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy CM Ajit Pawar) यांचा होता. त्यामुळे काही माध्यमांनी राजकीय अर्थ काढत तर्कही लढवले होते. पण खुद्द शरद पवार (NCP leader, Sharad pawar) यांनीच व्यासपीठावरून अजित पवार यांच्या अनुपस्थितीबद्दल खुलासा केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (mp supriya sule) यांनी नाथाभाऊंशी अजित पवारांची भेटच घालून दिल्याचा VIDEO समोर आला आहे.

सुप्रिया सुळे, अजित पवार आणि एकनाथ खडसे यांची ही भेट प्रत्यक्ष नसली तरी व्हर्च्युअल होती. त्याचा video समोर आला आहे. अजित पवार हे नाराज असण्याचं काहीच कारण नाही. फक्त कोरोनाचं संकट असल्याने काळजी घ्यावी लागते, त्यामुळे ते घरी असल्याचे सांगत शरद पवार या चर्चेला विराम देण्याचा प्रयत्न केला.

अजितदादांना Covid-19 ची लक्षणं दिसल्याने त्यांनी स्वतःला क्वारंटाइन करून घेतलं आहे. म्हणूनच त्यांनी या कार्यक्रमाला येणे टाळले होते. खडसे यांची आजच्या दिवशी अजितदादांशी राहून गेलेली भेट अखेर सुप्रिया सुळे यांनी घडवून आणली. त्यांनी सरळ अजितदादांना VIDEO कॉल करून नाथाभाऊंशी गाठ घालून दिल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यावर अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली होती. अजित पवार म्हणाले, राज्याचे ज्येष्ठ नेते, माननीय एकनाथरावजी खडसे साहेबांचे मी राष्ट्रवादी पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो. खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली असल्याचे ते म्हणाले.