… तर राष्ट्रवादी उत्तर महाराष्ट्रात एक नंबरचा होईल, खडसेंना मिळणार मोठी जबाबदारी, स्वतःच दिले संकेत

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी मंत्री एकनाथ खडसे (eknath-khadse) यांनी दसऱ्याला (dussehra) प्रथमच राष्ट्रवादी कार्यालयाया भेट दिली. वाईट प्रवृत्तींशी लढण्याचा हा दिवस असून अपल्यालाही समाजातील वाईट प्रवृत्तींविरोधात लढायचे असल्याचे खडसे यावेळी म्हणाले. आज पहिलाच दिवस असल्याने आपण जास्त काही बोलणार नाही असे खडसे यांनी सुरवातीलाच स्पष्ट केले. सर्वांनी मिळून संघटना वाढविली तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उत्तर महाराष्ट्रात नंबर एकचा पक्ष होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच आपल्याला मोठे पद मिळण्याचे संकेतच (get-key-responsibility-ncp) त्यांनी दिले आहेत.

राष्ट्रवादीच्या कार्यालयात खडसे दाखल होताच फटाके फोडून अन पुष्पवृष्टी करण्यात आली. महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. यावेळी माजी आमदार मनीष जैन, राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्षय अभिषेक पाटील, ज्ञानेश्वर महाजन, कुणाल पवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, जयश्री पाटील, ममता तडवी आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

जगवानी उतरण पुस्तकातून करणार गौप्यस्फोट
जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासोबतच माजी आमदार गुरुमुख जगवानी यानीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आपल्यावर जिल्ह्यात काय आणि कोणी अन्याय केला हे उतरण या आपल्या पुस्तकातून आपण मांडले असून लवकरच हे पुस्तक प्रकाशित होणार असल्याचे जगवानी यांनी माध्यमांना सांगितले. जिथे एकनाथ खडसे तिथे आपण, असे संगत आपण राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. 2016 मध्ये मला बिनविरोध निवडून आणण्यासाठी खडसेंनी एवढे कष्ट सोसले असताना आता त्यांच्या कठीण काळात मी त्यांना एकटे कसे सोडणार, असेही ते म्हणाले.