नाथाभाऊंची ‘एन्ट्री’ झाल्यानंतर आघाडीचे आमदार म्हणाले, ‘निष्ठावंत’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – राज्याच्या शेवटच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवसापासूनच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलेले दिसून येत आहे. पहिलीच दिवशी नवनिर्वाचित मंत्र्यांवरून अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले. त्याचबरोबर पक्षबदलू आमदारांवर देखील त्यांनी टीका करताना या आमदारांना मंत्रीपदे कोणत्या आधारावर दिली असा सवालदेखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. पहिल्या दिवशी सत्ताधाऱ्यांनी सभागृहात प्रवेश करताच ‘चोर आले रे चोर आले’ अश्या घोषणा देणाऱ्या विरोधकांनी आजदेखील सत्ताधाऱ्यांना धक्का देण्याचे काम केले.

आज विधानसभेच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी हस्तांदोलन केलं. त्याचबरोबर घोषणाबाजी करत सरकारचा विरोध केला. यावेळी आघाडीच्या आमदारांनी ‘निष्ठावंतांना डावलणाऱ्या सरकारचा निषेध असो,’ अशा घोषणा देत फडणवीस सरकारला टोला लगावला. त्यामुळे काही काळ विधानसभेच्या पायऱ्यांवर आमदार मजा घेताना दिसून येत होते.

दरम्यान, त्यांच्या या घोषणाबाजी सुरु असताना एकनाथ खडसे त्या ठिकाणी आले असता. त्यांचे सर्व आमदारांनी स्वागत केले. खडसे यांनी देखील त्यांचा हा सन्मान स्वीकारत सभागृहात प्रवेश केला. याचबरोबर सरकारला कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादीने हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत रणनीती ठरवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक घेण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

Loading...
You might also like