Eknath Khadse | भाजपा आमदाराची एकनाथ खडसेंवर टीका, पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन म्हणजे जेलमध्ये जाण्याचा सराव

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा दूध संघात (Jalgaon Jilha Dudh Sangh) एक ते दीड कोटी रुपयांचा अपहार झाला असून यातून दोषींवर गुन्हा (FIR) दाखल करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे नेते (NCP) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पोलीस ठाण्यासमोर 9 ते 10 तास ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण (BJP MLA Mangesh Chavan) यांनी खडसे यांच्यावरच गंभीर आरोप करत टीका केली आहे. खडसेंचे (Eknath Khadse) पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन म्हणजे जेलमध्ये जाण्याचा सराव असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

आमदार मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, जिल्हा दूध संघ अपहार प्रकरणात एकनाथ खडसे (Eknath Khadse) परिवारासह मोठ्या टोळीचा समावेश आहे. या टोळीचे प्रमुख एकनाथ खडसे आहेत. दूध संघाच्या प्रकरणात मी सुरुवातीला जी तक्रार दिली आहे. ज्यांच्याविरुद्ध माझी तक्रार आहे तेच आंदोलन करतात आणि तेच पोलिसात फिर्याद देतात. ही आश्चर्यकारक बाब असून एकनाथ खडसे आता बाहेर आहेत. मात्र ते जेलमध्ये जाण्याचा सराव करत आहेत.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी केलेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी अपहार प्रकरणी तक्रार घेतली. तब्बल आठ तासानंतर पोलिसांनी दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये (Manoj Limaye) यांची फिर्याद घेतली. जिल्हा दूध संघात मालाच्या तपासणीत दूध संघातून 14 टन 80 लाखांचे पांढरे लोणी बाहेरच्या जिल्ह्यात पाठवण्याचे भासवण्यात आले आहे. प्रत्यक्षात माल बाहेर गेल्याबद्दलच्या नोंदी आढळल्या नाही.

तसेच दूध पावडरच्या साठ्यात 30 ते 35 लाख रुपये किंमतीच्या 360 बॅगची तफावत आढळून आली आहे.
असे एकंदरीत 1 कोटी 15 लाख रुपयांच्या मालाची चोरी झाल्याचे तपासणीतून समोर आले.
संबंधित माल हा दूध संघातील अधिकार्‍यांच्या मदतीने इतरांनी चोरी केल्याचे दूध संघाचे कार्यकारी संचालक
मनोज लिमये यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

Web Title :- Eknath Khadse | mla mangesh chavan on eknath khadse jalgaon jilha dudh sangh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | प्रा. जी. एन. साईबाबा यांच्यावरील निकाल सर्वोच्च न्यायालयात रद्दबातल; देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

CM Eknath Shinde | राज ठाकरे, वर्षा गायकवाड CM शिंदेंच्या भेटीसाठी ’वर्षा’वर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!