Eknath Khadse | ‘…त्यावेळी भाजपला बिनविरोधची आठवण झाली नाही;’ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची भाजपवर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Eknath Khadse | सबंध राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक (Kasba and Chinchwad Bypolls) जाहीर झाली आहे. ही निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी सत्ताधारी भाजप (BJP) प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे ही निवडणुक लढण्यावर महाविकास आघाडी (MVA) ठाम आहे. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात (Kasba Assembly Constituency) भाजपबरोबरच काँग्रेस (Congress) पक्षदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) काय भूमिका घेते याकडे लक्ष लागलेले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, या मतदारसंघात भाजपचा पराभव होणार असून त्याठिकाणी प्रचारासाठी स्वतः उपस्थित राहणार आहे.

 

माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ खडसे म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकीनंतर माझेच नाव मुख्यमंत्रीपदासाठी घेतले जात होते. मात्र, त्याआधीच २०१६ रोजी मला राजीनामा द्यावा लागला. माझ्यावर खोटे आरोप करून मला राजीनामा द्यायला भाग पाडले. तसेच माझ्याविरोधात घडवून षडयंत्र रचले गेले, असा घणाघात यावेळी बोलताना एकनाथ खडसे यांनी भाजपवर केला.

 

तर, पुण्यातील कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. यावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, ‘कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव होईल. पंढरपूर, कोल्हापूरची जागा बिनविरोध न करता भाजपकडून त्यांचे उमेदवार उभे करण्यात आले होते. त्यावेळी भाजपला बिनविरोधाची आठवण झाली नाही. पुण्यात अनेक खानदेशी लोक राहतात, त्यामुळे या दोन्ही पोटनिवडणुक जागेच्या प्रचारासाठी आम्ही जळगावचे पदाधिकारी जाणार आहोत. स्वतः चार ते पाच दिवस तेथे प्रचार करणार आहे.’ अशी माहिती यावेळी बोलताना एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दिली.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी त्यांच्यावर सुरू असलेल्या चौकशीवर देखील यावेळी भाष्य केले.
एकनाथ खडसे म्हणाले, ‘राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यावर पूर्वीच्या समितीने जो अहवाल दिला होता,
तो नाकारून पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी सरकारने केली आहे. आयकर विभागाने दोन वेळा चौकशी केली.
त्यातही काही समोर आले नाही. त्यानंतर पुन्हा लाचलुचपत प्रतिबंध विभागामार्फत चौकशी करण्यात आली.
त्यातदेखील काही आढळले नाही. पुन्हा पुन्हा माझी चौकशी करण्यात येत आहे.
काहीतरी शोधून मला त्यात अडकविण्याचा प्रयत्न होत आहे.
संबंध नसलेल्या प्रकरणात देखील मला अडकविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
असे देखील यावेळी बोलताना एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.

 

Web Title :- Eknath Khadse| ncp eknath khadse claims that bjp will lose pune kasba and pimpri bypoll election

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nana Patole | मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर देखील नाना पटोले कसबा विधानसभा पोटनिवडणुक लढविण्यावर ठाम; म्हणाले…

Pune Bypoll Elections | कसबा आणि चिंचवड मतदारसंघासाठी जिल्हा प्रशासनाकडून मतदान केंद्रे निश्चित

Pervez Musharraf Passes Away | पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास