Eknath Khadse | ‘…म्हणून माझे दाऊदच्या बायकोबरोबर संबंध जोडण्यात आले’; नाथाभाऊंचे गंभीर आरोप

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Khadse | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अधिवेशनावेळी सभागृहात बोलताना उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली नसल्याचं म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गंभीर आरोप केले आहेत.

 

उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) मुख्यमंत्र्याची पात्रता असतानाही एकालाही मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली नाही हे उत्तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.
एकनाथ खडसे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहे हे समजता बरोबर माझी छळवणूक करण्यात आली असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे.
त्यासोबतच दाऊदच्या बायकोबरोबर संबंध जोडण्यात आले, खोटा भूखंड, ED प्रकरण असे अनेक आरोप माझ्यावर लावण्यात आले असल्याचं खडसे (Eknath Khadse) यांनी एका मराठी न्यूज चॅनेलशी बोलताना सांगितलं.

 

मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्याने रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांच्यामार्फत माझं फोन टॅपिंग (Maharashtra Phone Tapping) करण्यात आलं.
माझं विधानसभेचं (Assembly) तिकीटही कापण्यात आल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे.
60 वर्षापासून आम्हाला उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्रिपद मिळालं नाही,
उत्तर महाराष्ट्रावर होणारा अन्याय छळवणूक कधी ना कधी भरून निघेल, असं खडसे म्हणाले.

 

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दिल्लीला जातील त्यानंतर भाजप आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळेल, असा उपरोधिक टोलाही नाथाभाऊंनी लगावला आहे.

 

Web Title :- Eknath Khadse | NCP leader eknath khadse comment over ajit pawar statement regarding chief minister post and north maharashtra

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा