Eknath Khadse | एकनाथ खडसे यांचं मोठं विधान, म्हणाले – ‘भाजपमध्ये कोण कोण गद्दार आहेत हे राष्ट्रवादीत…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या चार दिवसांपासून विरोधक एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना ईडीने अटक केली, त्यांची मालमत्ता जप्त केली अशी अफवा पसरवत आहेत. परंतु मी कोणताही गुन्हा (Crime) केला नाही, सर्व व्यवहार कायदेशीर (All transactions are legal) आहेत. गेल्या 40 वर्षापासून तुम्ही सर्व मला ओळखता. 40 वर्षात कोणताही भ्रष्टाचार (Corruption) केला नाही, असं राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी म्हटले आहे. दरम्यान, भाजपमध्ये (BJP) कोण कोण गद्दार आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यावर मला सजलं असंही खडसेंनी सांगितले.

 

म्हणून माझ्या मागे ED

एकनाथ खडसे म्हणाले, एका व्यक्तीच्या कट कारस्थानातून माझ्यावर आरोप करण्यात आले. मी बीएचआर पतसंस्थेचा गैरव्यवहार (bhr scam) बाहेर काढला म्हणून माझ्या मागे ईडी (ED) लावण्यात आली, असा आरोप करत त्यांनी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. मी इन्कम टॅक्स भरतो याशिवाय जर इतर बेहिशोबी मालमत्ता असेल तर मी ती जाहीरपणे यांना दान करेन. काहीही करा आणि एकनाथ खडसेला जेलमध्ये टाका असं कारस्थान सध्या सुरु आहे. मात्र, मी कोणताही भ्रष्टाचार केला नाही, असे खडसेंनी (Eknath Khadse) म्हटले.

 

पक्ष सोडण्यासाठी परिस्थिती निर्माण केली

चाळीस वर्षे मी दिवसरात्र एक करुन भाजपाचा विस्तार केला, तरी माझ्यावर पक्ष सोडून जाण्याची परिस्थिती निर्माण करण्यात आली. माझ्यासारख्या व्यक्तीवर ही वेळ येत असेल तर भाजपमधील सर्वसामान्य कार्यकर्त्याचे काय होणार? मी संकटात असताना शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील (Jayant Patil) यांनी साथ दिली. मी त्यांना राष्ट्रवादीचा विस्तार करेन असा शब्द दिला आहे. तुम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या साथीने तो मला खरा करुन दाखवायचा आहे, असेही खडसे म्हणाले.

 

टरबूज ऑफ महाराष्ट्र कोण, गुगलवर जाऊन शोधा

एकनाथ खसडे यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताने त्याठिकाणी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी टरबूज असा आवाज देण्यास सुरुवात केली.
त्यावर एकनाथ खडसेंनी मला माहिती नाही असं म्हटलं.
पुढे म्हणाले, पण मला एक माहिती आहे. इंटरनेट ओपन करा, गुगलवर जा आणि टरबूज ऑफ महाराष्ट्र कोण? असं टाका.
इथून घरी गेल्यानंतर सर्वात आधी हेच काम करायचं.

 

Web Title : Eknath Khadse | ncp leader eknath khadse on bjp devendra fadanvis girish mahajan in jalgaon

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update