Eknath Khadse | मंत्र्यांच्या विसंगत वक्तव्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारची प्रतीमा मलीन होतेय, एकनाथ खडसे यांचे वक्तव्य, पंकजा मुंडेच्या ‘त्या’ वक्तव्यावरही केले भाष्य

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सरकारवर भाष्य करताना म्हटले आहे की, एकनाथ शिंदे यांचे सरकार आले तेव्हापासून त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य वेगवेगळे भाष्य करत आहेत. त्या सदस्यांच्या भाष्यामुळे ते टीकेचे पात्र होत आहेत. (Eknath Khadse)

 

एकनाथ खडसे म्हणाले, कधी तानाजी सावंत (Tanaji Sawant), कधी दीपक केसरकर (Deepak Kesarkar), गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), तर कधी अब्दुल सत्तार (Abdul Sattar), यांची विसंगत वक्तव्य समोर येत आहेत. प्रत्येकजण वेगवेगळे वक्तव्य करतोय. त्यामुळे या सरकारची प्रतिमा ही मलीन होत आहे. म्हणून शिंदेंनी इतर सर्व नेत्यांना कमी बोलण्याच्या सूचना दिल्यात, असे खडसे यांनी म्हटले.

 

दरम्यान, भाजपा नेत्या पंकजा मुंडे (BJP Leader Pankaja Munde) यांनी केलेल्या वक्तव्यावरही एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रतिक्रिया दिली. बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथे आयोजित ’समाजातील बुद्धिजिवी लोकांच्या सोबत संवाद’ या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, आपण आगामी निवडणुका लढताना काही बदल करुयात. ही निवडणूक पारंपरिक पद्धतीने न लढता वेगळ्या विषयावर निवडणूक लढू. जात-पात, पैसा-अडका, प्रभाव यापलीकडे जाऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. मीदेखील वंशवादाचे प्रतीक आहे, पण मला कुणीही संपवू शकत नाही. मी जनतेच्या मनावर राज्य केले, तर मोदींनीही मला संपवायचे ठरवले तरी ते संपवू शकत नाहीत.

पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यावर खडसे म्हणाले, पंकजा यांनी पंतप्रधानांविषयी केलेले वक्तव्य हे मीडियामध्ये अर्धवट प्रकाशित झाले आहे.
कालचे वक्तव्य हे जर पूर्ण ऐकले तर त्याचा अर्थ वेगळा होतो. मी मोदीजींना आवाहन देऊ शकत नाही,
असे पंकजाताईंशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मला सांगितले.

 

मी बेरोजगार आहे, हे वक्तव्य त्यांनी मंदिरात कार्यकर्त्यांशी बोलताना मस्करीमध्ये केले.
मीच बेरोजगार आहे तर तुला रोजगार कसा देऊ असे कार्यकर्त्यांशी बोलताना त्या म्हणाल्या.
या विषयाचा वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही.
पंकजाताईंनी मस्करीमध्ये देखील म्हटले तरी लोकनेत्या असल्यामुळे खळबळ उडते, असेही एकनाथ खडसे म्हणाले.

 

Web Title :- Eknath Khadse | ncp leader eknath khadse on pankaja munde regarding her statement on pm modi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rain in Pune | केवळ अर्ध्या तासात पुणे शहरात पावसाचा हाहाकार, अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना, एकाचा मृत्यू

Uddhav Thackeray vs BJP | शिल्लकसेनेचा दसरा मेळावा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भरवशावर, भाजपाची शिवसेनेवर टीका

Shobha R Dhariwal | विद्यार्थ्यांना संगणकाचे तांत्रीक प्रशिक्षण मिळणे काळाची गरज – शोभा आर धारीवाल