Eknath Khadse | ‘माझ्यापुढे शेपटी हलवणारे मला विचारतात 30 वर्षात तुम्ही काय केलं?’ टपरीवर फिरणाऱ्याला मी मंत्री बनवलं’ – एकनाथ खडसे

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. नाथाभाऊंच्या जीवावर मोठे झालेले कोण कुठे होतं? माझ्यापुढे शेपटी हलवणारे, मागेपुढे फिरणारे आणि तेच आता मला विचारतात 30 वर्षात तुम्ही काय केलं? टपरीवर फिरणाऱ्याला मी मंत्री (Minister) बनवलं. पक्षाचा आशीर्वाद असला तरी माझ्या शब्दाला मान होता आणि आता मेरी बिल्ली मेरे को म्याऊ, शेर शेर होता है, असा टोला एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गुलाबराव पाटलांना लगावला आहे. ते बोदवड नगरपंचायत (Bodwad Nagar Panchayat) प्रचार सभेत बोलत होते.

 

एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले, पारधीपासून (Pardhi) ते धरणगाव रस्ता (Dharangaon road) मी केला. जामनेर मतदारसंघात (Jamner constituency) सर्व धरणाचे (Dam) काम कोणी केली? गुलाबराव तुमच्या तालुक्यात अंजली धरण (Anjali Dam) मी बांधलं. तरी विचारता 30 वर्षात तुम्ही काय केलं? असा टोला खडसे यांनी लगावला. एकनाथ खडसे यांच्या या टीकेला गुलाबराव पाटील यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. टपरीचालकास बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी मंत्री केले होते यांनी नाही, असा पलटवार गुलाबराव पाटील यांनी खडसे यांच्यावर केला आहे.

एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन (Girish Mahajan) व पालक मंत्री गुलाबराव पाटील यांना बोदवड नगरपंचायत प्रचार जोरदार टीका केली.
नाथाभाऊ हा तुमचा बाप आहे असा आवाज खडसेंनी विरोधकांना दिला,
तर खडसे हे आता पावशेर उरलेत, असा बोचरा टोला गिरीश महाजन यांनी लगावला.
खडसे-महाजन-पाटील यांच्या जुगलबंदीमुळं बोधवडच्या निकालाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

Web Title :- Eknath Khadse | ncp leader eknath khadse on shivsena minister gulabrao patil in jalgaon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

TET Exam | टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी केली CM उध्दव ठाकरेंकडे ‘ही’ मागणी

Pune Crime | पुण्याच्या खराडी परिसरातील गॅलेक्झी अपार्टमेंटमध्ये 91 लाखांची वीजचोरी, एकावर FIR

 

Kajal Aggarwal Pregnancy News | ‘सिंघम गर्ल’ काजल अग्रवालचा बेबी बंपचा फोटो व्हायरल, सोशल मीडियावर रंगल्या तिच्या गरोदरपणाच्या चर्चा..

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या सॅलरीत होईल मोठी वाढ! 20 हजार रुपयांपेक्षा जास्त होऊ शकतो फायदा; समजून घ्या गणित