Eknath Khadse | राजकारणात इतिहासजमा झाले म्हणणाऱ्यांना एकनाथ खडसेंचे उत्तर; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Khadse | विधान परिषद निवडणुकीतही (Maharashtra MLC Elections 2022) मोठी चुरस पाहायला मिळत आहे. एकेकाळी भाजपचे (BJP) पहिल्या फळीतील नेते राहिलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना ऐन विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारली, त्यांनतर त्यांच्या मागे सुरू असलेला ED व अन्य तपास यंत्रणांचा ससेमीरा सुरू असतानाच खडसे यांनी राष्ट्रवादीचे (NCP) घड्याळ हाती बांधले. राज्यपाल नियुक्त सदस्यत्वाची यादी त्यामुळे खडसेंचे राजकारणातील मुख्य प्रवाहात येण्याला ब्रेक लागला होता. मात्र त्यानंतर आता तीन वर्षानंतर विधानपरिषदेच्या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.

 

गुरुवारी खडसे यांनी विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल केला त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना खडसे इतिहासजमा झाले आहेत असे म्हणणाऱ्यांना उत्तरे मिळाली’, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “भाजपने माझ्यावर अन्याय केला. पण, शरद पवार (Sharad Pawar) यांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला संधी दिली. खडसे इतिहासजमा झाले म्हणणाऱ्यांना उत्तरे मिळाली आहेत. निवडणुकीत विजय निश्चित असल्याचेही,’ त्यांनी सांगितले.

 

राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीत राष्ट्रवादीच्या कोट्यातून एकनाथ खडसे यांचे नाव सहभागी करण्यात आले होते. मात्र, राजभवनाने या यादीवर अद्यापपर्यंत मान्यतेची मोहोर उठवली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रवेशानंतरही खडसेंचे राजकीय पुनर्वसन झाले नव्हते. मात्र आता विधानपरिषदेच्या माध्यमातून त्यांचा आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

विधानभवनात खडसे – महाजन भेट..

अलीकडच्या काळामध्ये एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन (BJP Leader Girish Mahajan) यांच्यातील राजकीय वैर वारंवार दिसून आले आहे.
दोघांनी एकमेकांवर जाहीर टीकाही केली होती.
मात्र, योगायोगाने गुरुवारी दोन्ही नेते विधान मंडळात एकमेकांसमोर आले.
दोन्ही नेत्यांनी हसऱ्या चेहऱ्याने एकमेकांना अभिवादन केले.
यावेळी खडसेंचा हात महाजनांच्या खांद्यावर विसावला होता. तर महाजन यांनी नमस्कार करून खडसेंना शुभेच्छा दिल्या.
अवघ्या अर्धा मिनिटांच्या या भेटीची विधानभवनात चांगलीच चर्चा रंगली होती.
गिरीश महाजन हे उमा खापरे (Uma Khapare) यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते.

 

Web Title :- Eknath Khadse | NCP leader eknath khadse responds to those who say that history has been made in politics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा