Eknath Khadse | ‘…यावरचं मुख्यमंत्री आपली कॅसेट वाजवत आहेत’; एकनाथ खडसेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – जळगाव जिल्ह्यातील विकासाच्या अनेक समस्या असताना मुख्यमंत्री यावर फक्त आपलीच कॅसेट वाजवत आहेत. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केली आहे. ते जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लोहारी गावात बोलत होते. (Eknath Khadse)

 

मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर तीन वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्ह्यात आले. त्यांनी तिन्ही वेळा आयोजीत सभेत बोलताना शिवसेना पक्षातून बाहेर कसे पडलो, गुवाहटीला कसे गेलो, हीच कॅसेट वाजवली असे टीकास्त्र एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर सोडले. आम्हाला अपेक्षा होती की यादरम्यान ते जळगावच्या विकासासाठी काहीतरी देतील मात्र ते तेही देऊ शकले नाहीत असा टोला देखील यावेळी बोलताना एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

 

जळगाव जिल्ह्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जिल्ह्यात कर्जमाफीची सुद्धा अंमलबजावणी नीट झालेली नाही, पीक विमा कंपनीची ही बोंबाबोंब सुरू आहे. शेतकरी अशा मोठ्या अडचणीत असताना त्यावर काहीतरी निर्णय होईल अशी अपेक्षा होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दुर्लक्ष असल्याची टीका यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. पाचोरा तालुक्यातील लोहारी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली. या सभेत विकासावर कुठल्याच पद्धतीने चर्चा झाली नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करताना कुठल्याही पद्धतीने आचारसंहितेची अडचण नव्हती. मात्र त्याकडे एकनाथ शिंदेंचे दुर्लक्ष झाल्याची टीका देखील एकनाथ खडसे यांनी केली.

तसेच जळगाव जिल्ह्यात आले असता भाजपच्या आमदाराने मुख्यमंत्र्यांची गाडी चालवली होती. त्यावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, अशी मुख्यमंत्र्यांची गाडी दुसरी कुणी तरी चालवणे हे प्रोटोकॉलच्या विरोधात आहे. मात्र याबाबतचे नियम धाब्यावर बसवून या सगळ्या गोष्टी होत आहेत. अशी टीका एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपचे आमदार मंगेश यांच्यावर केली.

 

विजय भास्कर पाटील यांच्या अटकेवर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, विजय भास्कर पाटील
यांच्या विरोधात प्रकरणातील दाखल गुन्ह्यात पोलिसांनी जी कारवाई केली त्यावरूनही एकनाथ खडसेंनी पोलिसांच्या कारभारावर टीका केली आहे.
विजय भास्कर पाटील हे का गुन्हेगार किंवा दररोज दरोडेखोर होते का? 100 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी त्यांच्या घरी गेले.
जेवढे तत्परता विजय भास्कर पाटील यांच्या भावाला पकडण्यासाठी पोलिसांनी दाखवले
तेवढेच तत्परता मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचे
पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले याला पकडण्यासाठी पोलिसांनी लावले असती तर ते पकडले गेले असते.
मात्र एखाद्यास त्रास देण्याच्या हेतूने यंत्रणेचा दुरूपयोग केला जातो.
तसेच कुणाच्यातरी सुचनांवरून पोलिस काम करत असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी बोलताना केली.

 

Web Title :- Eknath Khadse | ncp leader eknath khadse slam cm eknath shinde jalagaon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | ‘इन्व्हेस्टमेंट मांगोगे, यूपी-गुजरात को देंगे’, जयंत पाटलांच्या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Former MLA Mohan Joshi | कर्नाटक विधानसभा निवडणूक निरीक्षकपदी मोहन जोशी

Anil Deshmukh | काटोल, नरखेड तालुक्यातील जनतेच्या प्रमुख मागणीचे अनिल देशमुखांकडून मुख्यमंत्र्याना पत्र…