Eknath Khadse | एक नोटीस आली काय अन् जळफळाट सुरु, तुम्ही नाथाभाऊंची पिळवणूक केली नाही का?, एकनाथ खडसेंचा फडणवीसांना सवाल

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक नोटीस आली आणि त्यांचा जळफळाट सुरु झाला. देवेंद्रजी म्हणतात मी भ्रष्टाचार (Corruption) बाहेर काढला म्हणून माझी पिळवणूक सुरु झाली. भाजपमध्ये (BJP) असताना तुम्ही नाथाभाऊंची (Nathabhau) पिळवणूक केली नाही का ? असा सवाल करत राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील (Muktainagar Taluka) पुरनाड येथे आयोजित कार्यक्रमात एकनाथ खडसे (Eknath Khadse) बोलत होते.

 

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सायबर पोलिसांनी (Mumbai Cyber police) चौकशीसाठी समन्स (Summons for Interrogation) पाठवल्याने त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) निशाणा साधला होता. यावरुन एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.

 

एकनाथ खडसे म्हणाले, मी मुख्यमंत्रिपदाचा (CM) दावेदार होतो हे तुम्हाला माहीत होतच तुम्ही माझी पिळवणूक सुरु केली.
माझ्यामागे जमीन भूखंड प्रकरण (Land Case), अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Underworld don Dawood Ibrahim) याच्या बायकोसोबत संबंध जोडले, अंजली दमानिया (Anjali Damania) यांना माझ्या मागं लावलं,
हे उद्योग कोणी केले ? अशा शब्दात त्यांनी फडणवीसांना फटकारले.

माझे फोन टॅप झाले
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना माझे फोन टॅप (Phone Tap) झाले, असा गंभीर आरोप खडसे यांनी केला आहे.
फोन कोणाचे टॅप होतात ज्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत.
माझे काय देशद्रोह्यांसोबत संबंध आहेत का ? मग माझा फोन टॅप करण्याचं कारण काय ? असा सवाल करत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Eknath Khadse | ncp leader eknath khadse slams bjp leader and leader of opposition in the assembly devendra fadnavis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा