Eknath Khadse | …तर हे सरकार कधीही कोसळू शकतं, एकनाथ खडसेंचा दावा

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण पाहता कधी काय होईल ते सांगता येत नाही. 2019 मध्ये शिवसेना-भाजप (Shiv Sena-BJP Alliance) एकत्र लढले. मात्र निकालानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी (NCP), काँग्रेस (Congress) सोबत आघाडी करुन राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर विरोधात बसलेल्या भाजप (BJP) कडून अनेकवेळा हे तीन चाकाचे सरकार कोसळेल असा दावा केला जात होता. याच दरम्यान एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शिवसेनेत बंडखोरी करुन भाजपच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. आता विरोधात असलेल्या मविआच्या नेत्यांकडून हे सरकार जास्तकाळ टिकणार नाही, कधीही कोसळे असा दावा केला जात आहे. यातच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी देखील सरकार कोसळू शकतं असं म्हटलं आहे. जळगावमध्ये माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) दावा केला आहे.

 

 

 

एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जे मंत्री आहेत त्यांच्यात एकमेकांवर कुरघोडीचे प्रयत्न सुरु आहेत. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी याविषयी उघडपणे सांगितले आहे. अब्दुल सत्तारांनी आता हे नेमके कोण आहेत ते स्पष्ट सांगावे. त्यांच्या विरोधात जे षडयंत्र झाल्याचे ते म्हणत आहेत त्यांची नावे त्यांनी जाहीर करावीत. या सरकारवर अद्यापही न्यायालयाची टांगती तलवार आहे. न्यायालय काय निकाल देतं त्यावर सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. त्यात मंत्र्यांमध्ये अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता जर वाढली तर सरकार कधीही कोसळू शकतं असा दावा खडसे यांनी केला.

 

हिवाळी अधिवेशनामध्ये (Winter Session) विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्यासह इतरांना टार्गेट केले. सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर अधिवेशनात आपल्याला अडकवणारे आणि बदनाम करणारे आपल्याच पक्षातील आहेत असं सत्तार यांनी म्हटलं. हा धागा पकडून एकनाथ खडसे यांनी मंत्र्यांमधली अस्वस्थता वाढली तर हे सरकार कधीही कोसळू शकतं असा दावा केला आहे.

29 जूनला महाविकास आघाडी सरकार हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या राजीनाम्यामुळे कोसळले.
त्यानंतर 30 जून रोजी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार (Expansion of Cabinet) करण्यात आला.
मात्र शिंदे गट (Shinde Group) आणि त्यांचे मंत्री सातत्याने काही ना काही वादात अडकत असल्याचे दिसत आहे.
मंत्र्यांमध्ये अस्वस्थता आहे ती जर वाढली तर हे सरकार कधीही कोसळू शकतं असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं.

 

 

 

Web Title :- Eknath Khadse | ncp leader eknath khadse very imp statement about
cm eknath shinde and dcm devendra fadnavis government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा