डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाईन – Eknath Khadse | राज्यात एका विशिष्ट पक्षाच्या माध्यमातून ‘लव्ह जिहाद’ विरोधात मोर्चे काढले जात आहेत. निवडणुका जशा जवळ येत आहेत, तसे जनआक्रोश मोर्चे, धर्मासंदर्भात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यामुळे नागरिकांच्या मनात हिंदुत्व जागे करणे आणि मतपेटीतून राजकीय लाभ मिळविणे, हा राजकीय पक्षाचा हेतू असू शकतो. असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना व्यक्त केले.
यावेळी बोलताना एकनाथ खडसे यांनी विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारवर देखील जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘पक्षात फूट पडू नये. आणि असंतोष निर्माण होऊ नये, म्हणूनचं राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार केला जात नाही. आजची जर महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर सरकार अस्थिर आहे. न्यायालयात काय निर्णय येतो, त्याच्यावर या सरकारचे भवितव्य अवलंबून असून या सरकारवर टांगती तलवार आहे. त्यामुळे सामान्य माणूस या सरकारच्या विरोधात मतदान करेल, असा संकेत सर्वेच्या माध्यमातून समोर आला आहे. हे सरकार सामान्यांचा विचार करत नाही. सामान्य जनतेला न्याय मिळत नाही.’ असे यावेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले.
तर, शिवसेना ठाकरे गट (Shivsena Thackeray Group) आणि वंचित बहुजन आघाडी (VBA) युतीवर भाष्य करताना एकनाथ खडसे म्हणाले की, ‘प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली. मात्र, या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कोणतीही चर्चा झाली नाही. अथवा युतीसंबंधीचा प्रस्ताव देखील आलेला नाही. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले आहे. पण जर यासंबंधीचा प्रस्ताव आला, तर पक्षातील वरिष्ठ नेते यासंदर्भात निर्णय घेतील.’ असेही यावेळी बोलताना एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले.
तर त्यापुढे बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, ‘कोणत्याही ठिकाणी किंवा डॉक्युमेंटरीमध्ये माझ्या वडिलांचे नाव वापरू नका.
हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मत आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे त्यांचे वडील होते.
त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी काय करावे, हे त्यांनी ठरवावे. याबाबत मी प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही.’
असेही यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे म्हणाले.
Web Title :- Eknath Khadse | NCP leader eknath-khadses-criticism-bjp-fadnavis shinde-government
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Supriya Sule | ‘वंचित’ सोबतच्या युतीबाबत स्पष्टचं बोलल्या सुप्रिया सुळे; म्हणाल्या…