Eknath Khadse | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे नॉट रिचेबल, राजकीय चर्चांना उधाण

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) आक्रमक चेहरा असलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) मागील काही दिवसांपासून नॉट रिचेबल (Not Reachable) झाले आहेत. एकनाथ खडसे (Eknath Khadse) पहिल्यांदाच नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे नेहमीच पक्षाची आक्रमक भूमिका मांडत असतात. तसेच कार्यकर्ता असो अथवा एखाद्या व्यक्तीने फोन केला तर ते फोन उचलून त्यांचे बोलणे ऐकून घेतात. परंतु एकनाथ खडसे मागील आठ दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. ते पहिल्यांदाच एवढे दिवस नॉट रिचेबल असल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Advt.

एकनाथ खडसे हे मुंबईत असून त्यांची प्रकृती खराब असल्याने ते सध्या आराम करत असल्याची माहिती मिळत आहे.
सर्वसामान्यांचा कधीही फोन रिसिव्ह करणारे नाथाभाऊ पहिल्यांदाच नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
मध्यंतरी ते पुन्हा भाजप (BJP) मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती.
परंतु त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत भाजपमध्ये जाणार नसल्याचे सांगितले होते.

Web Title :- Eknath Khadse | ncp mla eknath khadse not reachable for 8 days