Eknath Khadse On BJP | ‘भाजपने माझ्यावर अन्याय केला परंतु शरद पवारांनी विश्वास दाखवत संधी दिली’ – एकनाथ खडसे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Khadse On BJP | विधान परिषदेसाठी (Maharashtra MLC Elections 2022) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप पक्षाला (BJP) राम राम करुन राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलेल्या एकनाथ खडसेंना आता राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. (Eknath Khadse On BJP)

 

त्यावेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, “भाजपने माझ्यावर अन्याय केला परंतु शरद पवारांनी (Sharad Pawar) विश्वास दाखवत मला संधी दिली. एकनाथ खडसे राजकारणातून इतिहास जमा झालेत म्हणणाऱ्यांना उत्तर मिळाली,” असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. तसेच, ‘या निवडणुकीत आपला विजय होईल,’ असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. (Eknath Khadse On BJP)

 

दरम्यान, एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्यपाल नियुक्त आमदार (Governor Appointed MLA) यासाठी संधी देण्यात आली, मात्र जवळपास दीड वर्ष उलटून देखील अद्याप त्याबाबत निर्णय झाला नाही. परंतु दरम्यानच्या काळात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत खडसे यांनी 21 पैकी 11 जागा राष्ट्रवादीच्या निवडून आणून बँक आपल्या ताब्यात घेतली आणि खान्देशात पक्षाची ताकद वाढवली आहे.

 

Web Title :- Pune Crime | murder of youth in bharti vidyapeeth police station area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा