Eknath Khadse On Devendra Fadnavis | ‘जमिनीत तोंड काळं केलं नसतं तर…’ देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला एकनाथ खडसेंचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘तुमच्याकडे पाहिले तर…’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Khadse On Devendra Fadnavis | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (NCP MLA Eknath Khadse) यांच्यात मागील काही दिवसांपासून खडाजंगी होताना पाहायला मिळत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. फडणवीस जळगाव दौऱ्यावर आल्यावर त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला होता. याला प्रत्युत्तर देताना जमिनीमध्ये तोंड काळ केलं नसतं तर त्यांना काळे झेंडे दाखवण्याची वेळ आली नसती अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यानंतर आता एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Eknath Khadse On Devendra Fadnavis)

एकनाथ खडसे म्हणाले, मी मुख्यमंत्री (Chief Minister) पदाच्या शर्यतीत होतो, त्यामुळे त्यांनी (देवेंद्र फडणवीस) यांनी मला अडकवण्याचा प्रयत्न केला. मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मी जमिनच खरेदी केली नाही. मग जमिनीच्या व्यवहारात काळं तोंड करण्याचा काय संबंध आहे, असं प्रत्युत्तर खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांना दिले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. (Eknath Khadse On Devendra Fadnavis)

 

ते बालीश टीका करायला लागले

देवेंद्र फडणवीस यांनी काल माझ्यावर टीका केली. मला वाटतंय फडणवीस अलीकडच्या काळात नैराश्यात आहेत. लहान मुलांप्रमाणे ते बालिश टीका करु लागले आहेत. मुख्यमंत्री स्तरावरचा माणूस आणि माजी मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीने काय शब्द वापरवे, काय बोलू नये, हे समजायला पाहिजे. अलीकडच्या काळात विचित्र स्थिती पाहायला मिळत आहे. ते कधी समोरच्याला म्हणतात तुमचे सांगाडे बाहेर काढेन. तर कधी काहीही बोलतात.

 

तुमच्याकडे पाहिले तर…

तुमच्याकडे पाहिले तर अनेकजण तोंड काळं करण्याच्या पलीकडे काळेकुट्ट चेहरे तुमच्या शेजारी बसतात. त्यांच्यावर भ्रष्टाचार (Corruption) आणि गैरव्यवहाराचे आरोप तुम्हीच केले आहेत. आज ते तुमच्या मंत्रिमंडळात (Cabinet) असून ते तुमचे सहकारी आहेत. अशा भ्रष्ट लोकांना घेऊन तुम्ही मंत्रिमंडळ तयार केलं. यामध्ये अनेक आमदारही आहेत. त्यामुळे कुणी काळं तोंड केलं किंवा कुणी हिरवं तोंड केलं, असं म्हणण्यापेक्षा कापसाला भाव कधी देणार? हे सांगा. मूळ विषय बाजूला ठेऊ नका. कापूस उत्पादकांना (Cotton Growers) न्याय देयचा सोडून तुझं तोंड काळं केलं, त्याचं तोंड हिरवं केलं, हे बोलण्यात काय अर्थ आहे, असा टोला एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

 

Web Title :  Eknath Khadse On Devendra Fadnavis | NCP leader eknath-khadse-criticise-bjp-devendra-fadnavis-trapped-in-scam-because-was-candidate-of-cm


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Pune Chandani Chowk – Traffic Updates News | चांदणी चौकातील वाहतूक या काळात राहणार बंद !

Whimsical AI Artistry | राज्यातील नेत्यांचे हे क्युट डिस्नी कार्टून फोटो होत आहेत तुफान व्हायरल

Whimsical AI Artistry | राज्यातील नेत्यांचे हे क्युट डिस्नी कार्टून फोटो होत आहेत तुफान व्हायरल