Eknath Khadse On Devendra Fadnavis | ‘देवेंद्र फडणवीस आपल्या ज्युनिअर मंत्र्याच्या हाताखाली काम करतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं’ – एकनाथ खडसे

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Khadse On Devendra Fadnavis | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपच्या (BJP) नेत्यांनी काल सायंकाळी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी राहतील अशी मोठी घोषणा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट पाहायला मिळाला. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर अनेकांनी उलट प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी टीकास्त्र सोडलं आहे. (Eknath Khadse On Devendra Fadnavis)
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ खडसे यांनी शुभेच्छा देत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्यावेळी बोलताना खडसे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे आपल्या ज्युनिअर मंत्र्याच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं,” असा टोला त्यांनी लगावला.
पुढे खडसे म्हणाले, “एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याने दोघांना माझ्या शुभेच्छा. मागच्या सरकारपेक्षा अधिक चांगलं काम त्यांनी करावं आणि महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करावी,” अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, “देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्याची खूप मोठी अपेक्षा आहे. परंतु, पूर्ण ती झालेली नाही.
परिस्थितीनुसार त्यांनी हे पद स्वीकारलं असल्याचा टोलाही यावेळी खडसे यांनी लगावला.
त्याचबरोबर, एकनाथ शिंदे हे कोणत्या पक्षाचे तसेच त्यांनी कोणता पक्ष म्हणून भाजपला पाठिंबा दिला,
यावर विचारले असता खडसे म्हणाले की, ‘याबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टात (Supreme Court) प्रलंबित आहे.
कोर्टाच्या निकालानंतरच नेमकी खरी शिवसेना कोणती हे स्पष्ट होईल,” असं देखील ते म्हणाले.
Web Title :- Eknath Khadse On Devendra Fadnavis | ncp leader eknath khadse criticizes on cm eknath shinde and devendra fadnavis
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
LIC Jeevan Tarun Policy | रोज 150 रुपये जमा करून तुम्ही मुलासाठी बनवू शकता 8.5 लाखांचा फंड