Eknath Khadse | पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना मोठा दिलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा (Pune Bhosari Land Scam Case) प्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ खडसे यांना विशेष PMLA कोर्टाने (Special PMLA Court) 50 हजारांचा अंतरिम जामीन मंजूर (Interim bail granted) केला आहे. भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष पीएमएलए कोर्टामध्ये सुनावणी सुरु आहे. आज झालेल्या सुनावणीसाठी एकनाथ खडसे (Eknath Khadse) कोर्टात हजर होते.

 

यावेळी विशेष PMLA कोर्टाने एकनास खडसे (Eknath Khadse) यांना दिलासा दिला. काही दिवसांपूर्वी खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या विरोधातही सेशन्स कोर्टाने अटक वॉरंट काढले होते. त्यामुळे मंदाकिनी खडसे (Mandakini Khadses) यांच्या अटकेची शक्यता होती. मात्र, मंदाकिनी खडसे यांनी उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली होती. त्यांनी या प्रकरणात चौकशीसाठी हजर राहणार असल्याची ग्वाही दिली. त्यानंतर कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला.

 

यानंतर विशेष PMLA कोर्टाने एकनाथ खडसे यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. 50 हजारांवर खडसे यांना जामीन देण्यात आला आहे. त्यामुळे खडसे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

 

काय आहे प्रकरण ?
पुण्यातील भोसरीमध्ये गैरव्यहार प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी (Girish Chaudhary) यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता.
ईडीने (ED) एकनाथ खडसेंची (Eknath Khadse) चौकशी केली होती. त्यानंतर गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते.
ईडीने 13 तास चौकशी केल्यानंतर ईडीने (ED) गिरीश चौधरी यांना अटक केली.

 

Web Title :- Eknath Khadse | pune bhosari land scam case big relief to eknath khadse interim bail granted by mumbai Special PMLA court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Winters Superfood | आला हिवाळ्याचा हंगाम ! आजारांपासून बचाव करायचा असेल तर खाण्यास सुरूवात करा ‘हे’ 10 सुपरफूड

Pune BJP | 100 कोटी डोस पूर्ण झाल्याने पुणे भाजपकडून लसीकरण केंद्रात केक कापून ‘सेलिब्रेशन’

Pune Corporation GB | अनधिकृत केबल शोधण्यापूर्वी केबल कंपन्यांना नोटीस पाठवून ‘डिक्लेरेशन’ मागवणार – महापालिका सर्वसाधारण सभेचा निर्णय