मी काय गुन्हा केला आहे ते सांगा ? एकनाथ खडसे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राजकारणात होणाऱ्या गुन्हेगारीच्या आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात मी लढलो आहे. तरी ही माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. ते खरे आहेत कि खोटे हे सुद्धा कुणाला पाहू वाटत नाही. माझा माझ्या पक्षाला आणि सरकारला एकच प्रश्न आहे, मी काय गुन्हा केला आहे हे सांगा? मी जर काही गुन्हा केला असेल तर मी राजकारणातून निवृत्ती घेईल असे देखील एकनाथ खडसे यांनी म्हणले आहेत. तुमच्या मनातील मंत्री आणि तुमच्या मनातील नाथाभाऊ हा मीच आहे असे देखील एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

डॉ.सुधाकरराव जाधवर सोशल अ‍ँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे संस्थेच्या सभागृहामध्ये चौथ्या युवा संसदेचे आयोजन केले होते. त्यावेळी खडसे यांच्या हस्ते विजय शिवतारे यांना आदर्श मंत्री म्हणून पुरस्कार देण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार विनायक मेटे, डॉ.नीलम गो-हे आदी मान्यवर उपस्थित होते.

मागील ४० वर्षात मी एक हि निवडणूक पराभूत झालो नाही. सबंध चाळीस वर्ष मी लोकांसाठी संघर्ष करत पारदर्शी कारभार केला आहे. तरी मला भष्टाचारी समजले तसेच माझे दाऊदच्या बायकोशी संभाषण झाल्याचे देखील माझ्यावर खोटे आरोप केले गेले. ते आरोप खरे आहेत कि खोटे हे कोणी सुद्धा पहिले नाही. हि माझ्या मनातील खंत मी नेहमी बोलून दाखवली आहे. तसेच गोपीनाथ मुंडे आणि मी राजकारणातील गुन्हेगारी संपवण्यासाठी लढा दिला मात्र मी असा गुन्हेगार आधी झालो हे मलाच समजले नाही असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत.